Jump to content

फाटक (चित्रपट)

प्रसिद्ध साहित्यिक दशरथ यादव यांच्या फाटक कांदबरीवर मराठी चित्रपट निघाला आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गाणी श्री यादव यांची असून शरद गोरे दिग्दर्शक आहेत. यामध्ये प्रकाश धिंडले, सुषमा पाटील नायक नायिकेच्या भूमिकेत आहेत. याशिवाय नितीन पाटील, स्वाती, स्नेहा, विजय तुपे, संजय सोनवणे, रशिद काझी, चिल्या, फुलचंद नागटिळक, प्रकाश यादव, भारती आबनावे यांच्या मध्यवर्ती भूमिका आहेत. चाकोरी बाहेरची प्रेमकथा असलेला फाटक सिनेमा वास्तववादी समाज जीवनातील घडामोडीवर प्रकाश टाकतो.