Jump to content

फऱ्या (पशुरोग)

फऱ्या हा जनावरांना/प्राण्यांना,तसेच विशेषतः दुधाळू जनावरांना होणारा एक प्रकारचा रोग आहे.हा एक सांसर्गिक रोग आहे.विशेषकरून धष्टपुष्ट जनावरांना व २-३ वर्षे वयाच्या लहान जनावरांना होतो. हा रोग 'क्लोस्टिडियम शोव्हिया' या विषाणूंमुळे होतो.

इतर नावे

भारताच्या ग्रामीण भागात यास घावरे, घाट्या, एकटांग्या या स्थानिक नावांनीदेखील ओळखले जाते.

लागण

कुरणात चरणारी जनावरे,तसेच पाणथळी व दलदलीच्या जमिनीत चरणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते.याचे जंतूंनी प्राण्याच्या शरीरात प्रवेश केल्यावर काही काळ ते सुप्तावस्थेत राहतात.त्यांच्या वाढीस अनुकूल वातावरण मिळाल्याबरोबर ते आपला प्रभाव दाखवितात.

लक्षणे

रोगी जनावरास ताप येणे,जनावराचे मांसल भागावर विशेषतः फऱ्यावर(), मानेवर किंवा पाठीवर सूज येते.सूजेच्या ठिकाणी दाबल्यावर चरचर असा आवाज येतो.सुजलेला भाग काळा दिसतो. जनावर हळूहळू काळवंडते. त्याच्या शारीरिक क्रिया मंद होतात व नंतर मृत्यू ओढवतो.

औषधोपचार

प्रतिजैविक औषधांचा पशुवैद्यक डॉक्टरांचे सल्ल्याने वापर.

प्रतिबंधाचे उपाय

साधारणतः पावसाळ्यात या रोगाचा प्रादुर्भाव होतो. सबब, पावसाळ्यापूर्वी याची प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.

हेही बघा

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी