Jump to content

फर्स्ट लेडी पुरस्कार

फर्स्ट लेडी पुरस्कार हा भारताच्या केंद्र शासनातर्फे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. हा पुरस्कार भारतातील विविध क्षेत्रात विक्रम स्थापित करणाऱ्या महिलांना दिला जातो.भारत सरकारच्या केंद्रिय महिला व बालविकास मंत्रालयातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. इसवी सन २०१८ मध्ये भारतातील ११२ महिलांना हा पुरस्कार देण्यात आला. यात महाराष्ट्रातील १६ महिलांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील पुरस्कृत महिला

क्रमांकनावगावपुरस्कार कशासाठी
सुरेखा यादवसातारापहिल्या महिला प्रवासी रेल्वेचालक,रेल्वेची महिलांची महिला स्पेशल लोकल ट्रेन चालविली
भागश्री ठिपसेबुद्धिबळपटू, पाच वेळा राष्ट्रीय चॅंपियनशीप, जागतिक महिला मास्टर बहुमान
हर्षिनी कण्हेकरनागपूरअग्निशमन अधिकारी
शीला डावरेपरभणी जिल्हाप्रथम महिला ऑटोरिक्षाचालक
डॉ. भारती लव्हेकरवर्सोवा, मुंबईआमदार, पहिली महिला सॅनिटरी बँक स्थापना
अरुणा राजे पाटीलपुणेचित्रपटसृष्टी तंत्रज्ञ
डायना एडलजीभारतीय महिला क्रिकेट एकदिवसीय संघ कर्णधार
स्नेहा कामतमुंबईकार ड्रायव्हींग प्रशिक्षण संस्था स्थापना
रजनी पंडितनोंदणीकृत गुप्तहेर
१०स्वाती परिमलमुंबईअसोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अअँड इंडस्ट्रिज ऑफ इंडिया
११उपासना मकातीअंधांसाठी व्हाईट प्रिंट लाइफ स्टाईल हे ब्रेल लिपीतील मासिक
१२डॉ. इंदिरा हिंदुजामुंबईटेस्ट ट्युब बेबी प्रसूती करणाऱ्या स्त्रीरोग तज्ज्ञ
१३तारा आनंदमुंबईभारतातील महिला योद्ध्यांचा डिजिटल आर्टद्वारे परिचय करून देणारी महिला कलाकार
१४चंद्रानी प्रसाद वर्मामूळच्या चंद्रपूरच्या पण नागपूरला स्थाईकसीएस आय आर नागपूर येथे प्रधान शास्त्रज्ञ
१५दुर्गाबाई कामत (मरणोत्तर)भारतीय चित्रपट क्षेत्र-पहिल्या महिला नायिका
१६डॉ. अबन मिस्त्री (मरणोत्तर)पहिल्या महिला तबलावादक

अन्य पुरस्कारात स्मशानघाटावर काम करणारी प्रथम महिला, पहिल्या महिला वैमानिक,लेफ्टनंट जनरल बनणारी प्रथम महिला, भारतीय सेनेज रुजू होणारी प्रथम महिला,पहिली महिला मर्चंट नेव्हीची कप्तान, अंटार्टिकाला पोचणारी प्रथम महिला आदिंचा समावेश आहे.