Jump to content

फर्जंद (चित्रपट)

फर्जंद हा एक भारतीय मराठी महाकाव्य, ऐतिहासिक नाटक - दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित आणि अनिर्बन सरकार यांनी स्वामी समर्थ क्रिएशन्स एलएलपीच्या बॅनरखाली निर्मित वॉर चित्रपट आहे. संदिप जाधव, महेश जौरकर आणि स्वप्नील पोतदार यांनी या चित्रपटाची सहनिर्मिती केली होती. या चित्रपटात प्रसाद ओक, अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, नेहा जोशी आणि समीर धर्माधिकारी यांच्या भूमिका आहेत . []

फर्जंद हे योद्धा कोंडाजी फर्जंद यांच्या कथेचे अनुसरण करतात, ज्याने १६७३ मध्ये ६० योद्धांसह शत्रूच्या २५०० सैनिकांचा पराभव करून केवळ साडेतीन तासांत पन्हाळा किल्ला जिंकला होता. [] हा चित्रपट १ जून २०१८ रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाला सामान्यतः सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि त्याला व्यावसायिक यश घोषित करण्यात आले. []

कथानक

चित्रपटाच्या कथेची सुरुवात १६७० मध्ये पुण्याजवळील कोंढाणा किल्ला मुघल सैन्याकडून काबीज करताना तानाजी मालुसरे (गणेश यादव) यांच्या वीरगतीपासून होते. तीन वर्षांनंतर, जेव्हा शिवरायांचा राज्याभिषेक होणार आहे, तेव्हा छत्रपती शिवाजी ( चिन्मय मांडलेकर) अशी इच्छा व्यक्त करतात कि त्यांचा राज्याभिषेक तेव्हाच व्हावा, जेव्हा त्यांच्या राज्यात शांतता आणि सुरक्षितता असेल.

पन्हाळा किल्ला अजूनही विजापूरच्या आदिल शाहच्या बेशक खान या क्रूर सेनापतीच्या अधिपत्याखाली आहे, ज्यांचे सैन्य शेतकऱ्यांचा छळ केरतात. १६६६ मध्ये किल्ला ताब्यात घेण्याचा पूर्वीचा प्रयत्न, तो थोडक्यात अयशस्वी झाला होता. किल्ला परत मिळविण्यासाठी, मोहिमेची योजना आखली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराज कोंडाजी फर्जंद (अंकित मोहन) यांना मोहिमेसाठी सेनापती नियुक्त करतात. कोंडाजी फर्जंद अवघ्या ६० मावळ्यांसह २५०० सैनिंकांचे मजबूत रक्षण असलेला पन्हाळा किल्ला फक्त साडेतीन तासात जिंकतात. गुप्तहेर बहिर्जी नाईक (प्रसाद ओक) आणि खबरी केसर ( मृण्मयी देशपांडे ) हे हा किल्ला जिंकण्यासाठी मदत करतात.

कलाकार

निर्मिती

मुख्य छायाचित्रण नोव्हेंबर २०१७ मध्ये सुरू झाले. []

प्रदर्शन

हा चित्रपट १ जून २०१८ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. []

साउंडट्रॅक

चित्रपटातील गाणी अमितराज यांनी संगीतबद्ध केली असून दिग्पाल लांजेकर आणि क्षितीज पटवर्धन यांचे बोल आहेत.

Track list
क्र.शीर्षकSinger(s)अवधी
१."आई आंबे जगदंबे"  Adarsh Shinde4:17
२."तुह्मी येतां केला ईशारा"  Vaishali Samant4:20
३."वज्रबाहू महाबाहू (कोंडाजी थीम)" (Theme by Kedar Divekar)Chorus2:14
४."शिवबा मल्हारी" (Theme by Kedar Divekar)Prasad Oak, Ajay Purkar, Nikhil Raut, Astad Kale, Harish Dudhade & Sachin Deshpande4:19
५."शिव मुद्रा (Shivaji Theme)" (Theme by Kedar Divekar)Chorus1:58
६."जिजाऊ साहेब (जिजाऊ थीम)" (Theme by Kedar Divekar)Chorus1:21
७."रायगड प्रशस्ती (रायगड थीम)" (Theme by Kedar Divekar)Chorus0:45
एकूण अवधी:
20:12

प्रतिसाद

समीक्षकांच्या प्रतिक्रिया

द टाइम्स ऑफ इंडियाच्या रेणुका व्यवहारे यांनी चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार दिले आणि कलाकार व त्यांच्या पात्रांचे कौतुक केले. त्यामुळे या काळातील मराठी चित्रपटाला विश्वासार्हता लाभल्याचे तिने नमूद केले. अंकित मोहन, चिन्मय मांडलेकर, प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे आणि मृणाल कुलकर्णी यांचा उल्लेख करून तिने त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले. तिला असे वाटले की स्केल आणि व्हिज्युअल इफेक्ट्सची कमतरता कलाकारांची कामगिरी आणि चित्रपटाचा हेतू याने पूर्ण केली आहे. समारोप करताना, ती म्हणाली, "फर्जंद मनोरंजनापेक्षा अधिक माहितीपूर्ण ठरतो, परंतु जर तुम्ही इतिहासप्रेमी, जागरुक किंवा एखाद्या कारणाने बंडखोर असाल तर तो तुम्हाला योग्यरित्या गुंतवून ठेवतो."[] पुणे मिररचे गणेश मतकरी यांनी व्यवहारे यांच्याशी सहमती दर्शवत चित्रपटाला ५ पैकी ३ स्टार दिले. त्यांनी चित्रपटाच्या स्वच्छतेबाबत टीका केली कारण त्यांनी नमूद केले कि "आपण त्यांना किल्ल्यात प्रवेश करताना पाहतो तेव्हा आणि अगदी लढाईच्या वेळी देखील, त्यांच्या चमकदार गणवेशावर घाण डाग नाही." त्याने शेवटी असा निष्कर्ष काढला कि "फर्जंद हा एक महत्त्वाकांक्षी, परंतु जुन्या शालेय चित्रपट आहे जो एक मनोरंजक अनुभव देतो, जर तुम्ही तुमच्या अपेक्षा समायोजित करण्यास तयार असाल."[] लोकमतने चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार्स दिले आहेत.[] मराठी स्टार्सचे अभय साळवी चित्रपटाला ५ पैकी ३.५ स्टार्स देऊन म्हणतात कि, "सर्व महाराज भक्तांसाठी फर्जंद हा चित्रपट आहे ज्याची ते वाट पाहत होते! आणि इतर मराठी प्रेक्षकांसाठी देखील तुम्ही पहिल्यांदाच एक उत्साही ऐतिहासिक महाकाव्य अनुभवू शकता ज्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी आहे आणि जो फाजील आत्यंतिक देशाभिमानापासून दूर आहे." []

बॉक्स ऑफिस

फर्जंदची एकूण कमई 10 कोटी होती आणि चित्रपटाला व्यावसायिक दृष्ट्या यशस्वी घोषित करण्यात आले. [१०]

होम व्हिडिओ

हा चित्रपट 2018 मध्ये हॉटस्टारवर VOD म्हणून उपलब्ध करण्यात आला होता. [११]

पन्हाळा

संदर्भ

  1. ^ "Farzand poster unveiled - Times of India". The Times of India. 2018-01-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Chinmay Mandlekar celebrates 'Farzand' first anniversary with the film's poster". The Times of India. 2019-06-01.
  3. ^ "World Television Premiere of Farzand soon". The Times of India. 11 February 2019.
  4. ^ "Prasad Oak to sport six looks in Farzand". The Hindustan Times. 25 May 2018. 29 August 2019 रोजी पाहिले.
  5. ^ "'Farzand' trailer: Shivaji's Maratha warriors fight for the Panhala fort". Scroll.in. 8 May 2018.
  6. ^ Vyavahare, Renuka (31 May 2018). "Farzand Movie Review". The Times of India (इंग्रजी भाषेत). 29 August 2019 रोजी पाहिले.
  7. ^ Matkari, Ganesh (1 June 2018). "FILM: FARZAND" (इंग्रजी भाषेत). Pune Mirror India Times. 2021-05-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 August 2019 रोजी पाहिले.
  8. ^ "Farzand movie review". Lokmat. 31 May 2018. 29 August 2019 रोजी पाहिले.
  9. ^ Salvi, Abhay (1 June 2018). "Farzand Review: A Spirited Historical Epic!" (इंग्रजी भाषेत). Marathi Stars. 29 August 2019 रोजी पाहिले.
  10. ^ Vichare, Pooja (27 December 2018). "Flashback 2018: Aapla Manus to Mauli, 10 Marathi movies that were released in 2018 and have earned in millions". Times Now News 18. 29 August 2019 रोजी पाहिले.
  11. ^ "Farzand". Hotstar. 2018. 29 August 2019 रोजी पाहिले.