फरीदा खानम
फरीदा खानम | |
---|---|
फरीदा खानम | |
आयुष्य | |
जन्म स्थान | ब्रिटिश भारत |
व्यक्तिगत माहिती | |
धर्म | इस्लाम |
नागरिकत्व | पाकिस्तानी |
मूळ_गाव | अमृतसर |
देश | पाकिस्तान |
संगीत साधना | |
गुरू | उस्ताद आशिक अली खान |
गायन प्रकार | गझलगायन |
घराणे | पतियाळा |
संगीत कारकीर्द | |
पेशा | गायकी |
गौरव | |
विशेष उपाधी | मलिका-ए-गझल |
फरीदा खानम ( उर्दू / पंजाबी : فرِیدہ خانُم ) या पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील पाकिस्तानी शास्त्रीय गायिका आहेत. शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतलेल्या पाकिस्तानमधील मोजक्या गायिकांपैकी त्या आहेत. २००७ साली त्यांना टाइम्स ऑफ इंडियाने ‘मलिका-ए-गझल’ हा पुरस्कार दिला.[१]
पूर्वायुष्य
फरीदा खानम यांचा जन्म ब्रिटिश भारतात कोलकाता येथे १९२९ साली झाला. त्यांना एक बहीण आणि तीन भाऊ अशी चार भावंडे होती. त्यांची बहीण मुख्तार बेगम प्रसिद्ध गायिका आहे. त्या अठरा वर्षाच्या असताना भारताच्या फाळणीच्यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब भारतातील अमृतसर येथून पाकिस्तानातील लाहोरला स्थलांतरित झाले.
संगीतातील शिक्षण
खानम यांनी पतियाळा घराण्याच्या उस्ताद आशिक अली खान यांच्याकडून खयाल, ठुमरी आणि दादरा यांचे शिक्षण घेतले.[२] लहानपणी त्यांची बहीण मुख्तार बेगम त्यांना खान यांच्याकडे नियमित रियाजासाठी घेऊन जात असे.
कारकीर्द
फरीदा खानम यांनी पहिली सार्वजनिक मैफल वयाच्या २१ व्या वर्षी सादर केली. त्यानंतर त्यांनी रेडिओ पाकिस्तानसाठी गायला सुरुवात केली. इथे त्यांना स्वतःची ओळख मिळाली. जलद ताना आणि सरगम हे त्यांच्या गायकीचे वैशिष्ट्य आहे.१९६० च्या दशकात पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष अयूबखान यांनी त्यांना सार्वजनिक कार्यक्रमासाठी आमंत्रित केले तेव्हा त्या स्टार बनल्या. त्यानी पाकिस्तान टेलिव्हिजन आणि इतर पाकिस्तानी टीव्ही वाहिन्यांवरून अनेकदा कार्यक्रम सदर केले आहेत. ‘आज जाने की ज़िदना करो’ ही त्यांची गझ़ल विशेष लोकप्रिय आहे. या गझ़लच्या कवयित्री फय्याज़ हाश्मी आहेत. २०१५ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी कोक स्टुडिओच्या (पाकिस्तान) सीझन ८ मध्ये ही गझल गायली होती.[३]
१९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि १९७० च्या दशकाच्या पूर्वार्धात त्यांनी मैफलींसाठी काबुलला भेट दिली. तिथे त्यांनी अफगाण संगीतकारांबरोबर काम केले आणि पर्शियन भाषेतील गझला गायल्या.
त्यांनी अनेक पाकिस्तानी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आहे. तसेच काही चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केला आहे.[४] 'मीरा नायर दिग्दर्शित 'मान्सून वेडिंग' चित्रपटात त्यांनी 'आज जाने की ज़िद न करो' ही गझल गायली.[५]
'कसम उस वक्त की' या पाकिस्तानी चित्रपटासाठी त्यांनी गायिलेली गीते विशेष गाजली.
भारतातील मुंबई, चेन्नई इ.शहरांत त्यांनी मैफली सादर केल्या आहेत.
वैयक्तिक आयुष्य
फरीदा खानम पाकिस्तानमधील लाहोर येथे राहतात. त्यांना पाच मुली आणि एक मुलगा आहे. फरीदा खानमना पाकिस्तानमध्ये प्रेमाने 'मलिका-ए-गझल’ म्हणले जाते.
पुरस्कार
- पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांकडून प्राईड ऑफ परफॉर्मन्स पुरस्कार (१९७०)
- हाफिज अली खान पुरस्कार, भारत (२००५)[६]
- पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांकडून हिलाल-ए- इम्तियाझ पुरस्कार (२००५)[७]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Fareeda Khanum: Made in India, queen of Pak music-India-The Times of India". web.archive.org. रोजी मूळ पानापासून संग्रहित2007-06-10. 2020-03-11 रोजी पाहिले.CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
- ^ "The queen of ghazals". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2020-03-11 रोजी पाहिले.
- ^ "Farida Khanum - Artists - Season 8 - Coke Studio Pakistan". www.cokestudio.com.pk. 2020-03-11 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "The queen of ghazals". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2020-03-11 रोजी पाहिले.
- ^ "The queen of ghazals". Deccan Herald (इंग्रजी भाषेत). 2020-03-11 रोजी पाहिले.
- ^ "The Sunday Tribune - Spectrum". www.tribuneindia.com. 2009-08-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-11 रोजी पाहिले.
- ^ "Farida Khanum - Artists - Season 8 - Coke Studio Pakistan". www.cokestudio.com.pk. 2021-02-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-03-11 रोजी पाहिले.