फरीद मिर्झा
फरीद मिर्झा (७ जुलै, १९१८:हैदराबाद, हैदराबाद संस्थान - ) है निजामशासनातील सरकारी अधिकारी होते. यांनी हैदराबाद मुक्तिसंग्रामाला पाठिंबा दिला.
शिक्षण व नोकरी
हैदराबाद येथील उस्मानाबाद विद्यापीठातून त्यांनी आपली पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर निजाम सरकारच्या महसूल खात्यात ते अधिकारी म्हणून रुजू झाले. महात्मा गांधी यांच्या विचारांचा त्यांच्यावरती प्रभाव होता.
हैदराबाद मुक्तिसंग्राम आणि मिर्झा
सन १९४७-४८ मध्ये खरीद मिर्झा हे कंधार येथे तहसीलदार म्हणून कार्यरत होते. रझाकारांच्या धर्मांध कारवायाविरुद्ध त्यांनी स्पष्ट शब्दात निजाम सरकारला कळवले होते आणि रजाकारांचा विरोध केला होता. १५ जुलाई १९४८ रोजी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
निजाम सल्तनत के गद्दार
रझाकार आणि इतर जात्यंध धार्मिक संघटनांना विरोध करून एक प्रकारे फरीद मिर्झा निजामालाच विरोध करत होते आणि म्हणून त्यांना रजाकारांनी निजाम सल्तनत के गद्दार म्हणले.
संदर्भ
- हैदराबाद लिबरेशन स्ट्रगल (कलेक्शन ऑफ ओरल डॉक्युमेंट्स हिस्टरी) संपादक - डॉ. प्रभाकर देव, प्रकाशक- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड