फतवा
दारुल उलूम देवबंद या भारतातील मुसरमानांच्या सर्वश्रेष्ठ शैक्षणिक संस्थांपैकी एक असणाऱ्या संस्थेने काढलेले फतवे :
- मुसलमान व्यक्तीने कुणाचाही वाढदिवस साजरा करू नये, ते इस्लामविरोधी आहे. त्यामुळे महंमद पैगंबरांचा वाढदिवसही साजरा करणे चुकीचे आहे.
- स्त्रियांना तंग कपडे वापरू नयेत, त्यांचे कपडे ढिलेच असले पाहिजेत.
- कोणत्याही प्रकारचे गर्भनिरोधक वापरायला इस्लाम परवानगी देत नाही, पण जर काही आरोग्याच्या समस्यांसाठी एखाद्या ॲलोपॅथिक डॉक्टराने सांगितलेच असेल तर त्यासाठी हकिमाच्या सल्ल्याने खातरजमा करून घ्यावी. त्याने सांगितले तरच ते मानावे.
- जी कंपनी दारू किंवा व्याजाचे व्यवहार करीत असेल अशा कंपनीच्या शेअर्सचे व्यवहार मुसलमानांनी करू नयेत.
- मुसलमान स्त्रीने गर्भपात करण्यासाठी हकिमाची अनुज्ञा घेणे बंधनकारक आहे.
- इस्लाममध्ये गाईची हत्या करणे पाप आहे.
- हातावर गोंदणे आणि अल्कोहोलयुक्त सुगंध वापरणे गैरइस्लामी आहे.
- मुस्लिम मुलींनी जीन्स घालू नयेत आणि अंगावर कुठेही गोंदवून घेऊ नये.
- वाढदिवसाच्या दिवशी केक कापणे बेकायदेशीर आहे. खरे तर मुसलमानाने वाढदिवस साजरा करताच कामा नये.
अन्य संस्थांचे फतवे
- सुन्नी पंथीय मुस्लिमांच्या बरेली(उ.प्र.) येथील हजरत दर्ग्याच्या मदरसा मंझर-ए-इस्लामचा फतवा : लग्न जुळवणाऱ्या किंवा सोशल नेटवर्किंगच्या संकेतस्थळावर स्वतःचे छायाचित्र टाकणे हराम आहे.