Jump to content

प्रॉक्टर अँड गँबल

प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनी तथा पी अँड जी ही अमेरिकेत मुख्यालय असलेली बहुराष्ट्रीय कंपनी आहे. १८३७मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचे मुख्यालय ओहायोच्या सिनसिनाटी शहरात आहे.

ही कंपनी मुख्यत्वे ग्राहकोपयोगी वस्तू बनविते. यात घरगुती तसेच व्यक्तिगत स्वच्छतेच्या वस्तूंचा समावेश आहे. २०१४मध्ये प्रॉक्टर ॲड गॅम्बलने ८३.१ अब्ज अमेरिकन डॉलरची विक्री केली. त्याच वर्षी आपली १००पेक्षा जास्त उत्पादने विकून टाकून आपल्या मूळ उद्योगावर लक्ष केंद्रित करण्याचे पी अँड जीने ठरविले. या १०० ब्रॅंडमध्ये प्रिंगल्स, क्रिस्को आणि मिलस्टोन कॉफीचा समावेश होता. आता पी अँड जी ६५ ब्रॅंडच्या वस्तू बनविते. यात शार्मिन, बाउंटी, ऑलवेझ, जिलेट, पॅम्पर्स आणि पॅन्टीनसारख्या ब्रॅंड आहेत. ही उत्पादने भारतासह २९ देशांमध्ये तयार होतात व जगभर विकली जातात.