Jump to content

प्रेस्बिटेरियन

प्रेस्बिटेरियन हा ख्रिश्चन धर्माचा एक पंथ आहे. प्रोटेस्टंट पंथाची एक उपशाखा असलेला हा पंथ ब्रिटन आणि स्कॉटलॅंडच्या आसपासच्या प्रदेशांत अंदाजे १६व्या शतकात उदयास आला. या पंथावर जॉन कॅल्व्हिन आणि त्याचा शिष्य जॉन नॉक्स यांच्या विचारांचा प्रभाव आहे परंतु हा पंथ कॅल्व्हिनिस्ट पंथापेक्षा वेगळा आहे.

या पंथाचे नाव चर्चमधील एक प्रकारच्या सत्ताव्यवस्थेचे नाव आहे. प्रेसबिटेरियन सत्ताव्यवस्थेत वरिष्ठ भक्तांच्या (एल्डर) समितीद्वारे चर्चचे कामकाज पाहिले जाते.