Jump to content

प्रेमा धनराज

प्रेमा धनराज
आयुष्य
जन्म ३० जून १९५०
जन्म स्थान बंगळूर , कर्नाटक , भारत
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
गौरव
पुरस्कार पद्मश्री पुरस्कार

प्रेमा धनराज ( बंगळूर, कर्नाटक, भारत ) या सी.एम.सी, वेल्लूर येथील प्लास्टिक आणि पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया विभागाच्या प्रमुख आणि अग्नि रक्षाचे संस्थापक संचालिका आहेत. अग्नि रक्षा च्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल भारत सरकारचा डॉ. प्रेमा यांना २०२४ सालचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.[]

ओळख

डॉ. प्रेमा धनराज या कर्नाटकातील बंगळूर येथील रहिवासी आहेत. वयाच्या आठव्या वर्षी, स्टोव्हचा स्फोट झाला तेव्हा प्रेमाला ५०% भाजले.[] वेल्लोरच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यावर १४ शस्त्रक्रिया झाल्या त्याच्या नंतर कसेबसे त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर हुबळी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतले आणि एमबीबीएस शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सीएमसी लुधियानामधून प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीमध्ये एमडी केले. त्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्या १९८९ मध्ये शल्यचिकित्सक म्हणून CMCH मध्ये परतल्या.[]

कारकीर्द

डॉ. प्रेमा यांना १९९८ मध्ये American Bar Association, ISBI, PSEF, Rotary कडून पुरस्कार मिळाला होता, ज्याची बक्षीस रक्कम $१०,००० होती या रकमेतून १९९९ मध्ये डॉ. प्रेमा आणि त्यांची बहीण चित्रा यांनी अग्नि रक्षा या एनजीओची स्थापना केली [] आणि २५,००० जळीतग्रस्तांवर मोफत शस्त्रक्रिया केल्या.[] त्यांनी प्लास्टिक सर्जरीवर ३ पुस्तकेही लिहिली Basics in Burns for Nurses by Prema Dhanraj आणि Plastic Surgery Made Easy by Prema .जागतिक स्तरावरही त्यांनी काम केले आहे. इथिओपियाचे पहिले बर्न युनिट स्थापन करण्याचे आणि केन्या, टांझानिया, नॉर्वे आणि इथिओपिया येथील डॉक्टरांचा सन्मान करण्याचे श्रेयही त्यांना जाते.[]

संदर्भ

  1. ^ "Padma Awards 2024 announced". pib.gov.in (इंग्रजी भाषेत). 25 January 2024. 3 February 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Dr. Prema Dhanraj: आठ की उम्र में जल गया था आधा शरीर, डॉक्टर बन जले लोगों का फ्री में करने लगीं इलाज, मिलेगा पद्मश्री". Zeenews.com (हिंदी भाषेत). 26 January 2024. 27 January 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Burns survivour once admitted to CMS now doc in same hospital, wins Padma Shri". newindianexpress .com (इंग्रजी भाषेत). 29 January 2024. 3 February 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "A burning question". thehindu.com (इंग्रजी भाषेत). 22 June 2013. 2 July 2018 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Crusader for tribal rights, plastic surgeon who made a mission out of personal tragedy in Padma Awards list". thehindu.com (इंग्रजी भाषेत). 25 January 2024. 29 January 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Prema Dhanraj Superannnuates". yumpu.com (इंग्रजी भाषेत). 12 July 2010. 3 February 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 February 2024 रोजी पाहिले.