प्राची धबल देब
प्राची धबल देब | |
---|---|
जन्म | १९८६ रेवा (मध्य प्रदेश) |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | केक कलाकार |
जोडीदार | प्रणवेश धबल देब |
अपत्ये | श्रीहान धबल देब |
वडील | राजन सिंग |
आई | अनुराधा सिंग |
प्राची धबल देब ही भारतीय केक कलाकार आहे. भारतातील सर्वात मोठा केक शो असलेल्या केकॉलॉजी केक या कार्यक्रमाची ती मुख्य परीक्षक आहेत.[१] प्राचीच्या नावे वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन मध्ये ३ जागतिक विक्रम नोंदवले आहेत.[२][३][४][५] जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठात सत्कार होणारी ती पहिली केक कलाकार आहे.[६][७][८][९]
जीवन
प्राचीचा जन्म मध्य प्रदेशातील रेवा येथे १९८६ या वर्षी झाला. डेहराडून, उत्तराखंड या ठिकाणी प्राचीने शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने कोलकाता विद्यापीठातून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.[ संदर्भ हवा ] प्राची धबल देब यांचा विवाह प्रणवेश धबल देब यांच्याशी झाला असून ते पुण्यात राहतात. त्यांना श्रीहान धबल देब हा मुलगा आहे.[ संदर्भ हवा ]
कारकीर्द
प्राची धबल देब ही जगातील रॉयल-आयसिंगच्या महत्वाच्या कलाकारांपैकी एक म्हणून ओळखली जाते.[१०] ती रॉयल आयसिंगच्या शाकाहारी आवृत्तीची निर्माती आहे. प्राचीने स्वतः तयार केलेले रॉयल-आयसिंगचे केकसाठी लागणारे सर्व साहित्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.[ संदर्भ हवा ]
पुरस्कार
- रॉयल आयसिंग कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल जुलै २०२४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात सन्मान[७]
- २०२४ या वर्षातील सर्वात प्रख्यात रॉयल आइसिंग केक कलाकार म्हणून इंग्लंड संसदेत सत्कार[११]
- फेमिना मासिकात नोव्हेंबर २०२३ मध्ये संपूर्ण भारतातील ४० प्रेरणादायी महिलांच्या यादीत समावेश[१२]
- वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन - सर्वात मोठे शाकाहारी रॉयल आयसिंग स्ट्रक्चर, फेब्रुवारी २०२२[१३]
- महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्री भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते भारत लीडरशिप अवॉर्ड्स जुलै २०२०
संदर्भ
- ^ "Cakeology 2024: Prachi Dhabal Deb, World Record Cake Artist, Takes Center Stage As Head Judge". Outlook India (इंग्रजी भाषेत). 2024-01-03. 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ "Prachi Dhabal Deb from Pune, (Maharashtra) India gets included by World Book of Records". worldbookofrecords.uk (इंग्रजी भाषेत). 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ वेबटीम, एबीपी माझा (2023-05-06). "200 किलोचा केक! प्राची देब यांनी मोडला स्वत:चाच वर्ल्ड रेकॉर्ड". marathi.abplive.com. 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2023-05-06). "Pune World record : पुणे शहरातील कलाकाराने केला जागतिक विक्रम, बनवला जगातील सर्वात मोठा केक". TV9 Marathi. 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ "अॅनालिस्टचे काम सोडून बनली केक आर्टिस्ट; प्रतिभेने मिळवून दिली महाराष्ट्रातील कन्येला आंतरराष्ट्रीय ओळख, कोण आहे प्राची?|analyst to become a cake artist Talent brought international recognition to a girl from Maharashtra". Loksatta. 2023-05-14. 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ "Pune Cake Artist & World Record Holder gets honoured at Oxford University for Excellence in Royal Icing Art". 2024-07-20. ISSN 0971-8257.
- ^ a b "Pune Cake Artist Prachi Dhabal Deb Honoured At Oxford University For Excellence In Royal Icing Art (WATCH VIDEOS)". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ Bharat, E. T. V. (2024-07-19). "पुण्यातील केक आर्टिस्ट प्राची धबल देब यांचा ऑक्सफर्ड विद्यापीठात सन्मान - Prachi Deb Honored". ETV Bharat News. 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ "केक आर्टिस्ट प्राची धबल देब को ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में मिला सम्मान". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ "Meet cake artist Prachi Dhabal Deb, who made it to the World Book of Records with her royal icing structures". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2022-03-09. 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ "देश की पहली केक आर्टिस्ट प्राची धबल देब, जिसे यूके संसद के हाउस ऑफ कॉमन्स में मिला सम्मान". DNA Hindi (हिंदी भाषेत). 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ "The Royal Cake Artist- Prachi Dhabal | Femina.in". www.femina.in (इंग्रजी भाषेत). 2024-08-23 रोजी पाहिले.
- ^ "World record : पुणे की आर्टिस्ट ने बनाया 100 किलो का केक, वर्ल्ड रेकॉर्ड में हुआ शामिल, देखकर रह जाएंगे दंग". Navbharat Times (हिंदी भाषेत). 2024-08-23 रोजी पाहिले.