प्रहर
८ प्रहरांचा १ दिवस होतो. त्यामुळे प्रत्येक प्रहर ३ तासांचा होतो. प्राचीन काळात दिवसाच्या विभाजनाचे प्रहर हे ढोबळ वेळमापन होते. आजही दुपार(दोन प्रहर), सकाळच्या प्रहरी, अष्टौप्रहर या शब्दांत ‘प्रहर’चे अस्तित्व आहे.
हिंदू धर्मानुसार दिवस-रात्र मिळून २४ तासात आठ प्रहर होतात. एक प्रहर जवळपास तीन तासाचा किंवा साडे सात घटकांचा होतो. त्याच्यात दोन मुहूर्त असतात. एक घटिका २४ मिनिटांची. दिवसाचे चार आणि रात्रीचे चार असे एकूण आठ प्रहर.
दिवसाचे विभाजन साधारण असे होईल:-
(दिवसा) ०६ ते ०९ किंवा ०६-०९ पूर्वान्ह
(दिवसा) ०९ ते १२ किंवा ०९-१२ मध्यान्ह
(दिवसा) १२ ते ०३ किंवा १२-१५ अपरान्ह
(दिवसा) ०३ ते ०६ किंवा १५-१८ सायंकाल
(रात्री) ०६ ते ०९ किंवा १८-२१ प्रदोष
(रात्री) ०९ ते १२ किंवा २१-०० निशिथ
(रात्री) १२ ते ०३ किंवा ००- ०३ त्रियाम
(रात्री) ०३ ते ०६ किंवा ०३-०६ उषा