Jump to content

प्रसवोत्तर जंतुसंसर्ग

प्रसवोत्तर जंतुसंसर्ग
----
स्ट्रेप्टोकॉकस प्योजेन्स(लाल रंगाचे गोल) हे अनेक बाबतीत तीव्र प्रसवोत्तर तापास कारणीभूत असतात. (९०० पट विस्तृतीकरण)
ICD-10 O85
ICD-9672
eMedicinearticle/796892
MeSHD011645

प्रसवोत्तर जंतुसंसर्ग, ज्यांना प्रसूतीपश्चात जंतुसंसर्ग, प्रसवोत्तर ताप किंवा प्रसूतीनंतर येणारा तापअसेही म्हणतात, तो बाळाचा जन्म किंवा मिसकॅरेज नंतरचा स्त्री प्रजोत्पादन मार्गात होणारा जिवाणू संसर्ग असतो. चिन्हे आणि लक्षणांमध्ये थंडी वाजून येणारा मोठा३८.० °से (१००.४ °फॅ)ताप, ओटीपोटात वेदना आणि कदाचित दुर्गंधीयुक्त योनी स्रावयांचा समावेश असतो.[] तो बहुधा प्रसूतीच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये पहिल्या २४ तासानंतर घडतो. []

सर्वात सामान्य जंतुसंसर्ग हा गर्भाशयाचा आणि सभोवतालच्या उतींचा असतो ज्याला प्रसवोत्तर पू होणे किंवा प्रसूतीनंतर गर्भाशयस्नायू दाह म्हणतात. जोखीम घटकांमध्ये सिझेरियन सेक्शन, एखाद्या जिवाणूची उपस्थिती जसे की योनीमध्ये ब गट स्ट्रेप्टोकॉकस, अकाली पडदा फाटणे, आणि इतर घटकांमध्ये लांबलेले बाळंतपण हे देखील समाविष्ट असतात. बऱ्याचशा जंतुसंसर्गांमध्ये अनेक विविध प्रकारचे जिवाणू सामील असतात. योनी किंवा रक्ताच्या संवर्धन निदानामध्ये क्वचितच मदत होते. ज्यांच्यामध्ये सुधारणा होत नाही त्यांना मेडिकल इमेजिंग करणे आवश्यक असू शकते. प्रसूतीनंतरच्या तापाच्या इतर कारणांमध्ये यांचा समावेश होतो: अतिरिक्त दुधामुळे स्तन दुखणे, मूत्रमार्गातील जंतुसंसर्ग, ओटीपोटावरील छेदाचा किंवा भगछेदन यांचे जंतुसंसर्ग आणि फुफ्फुसांमधील हवेच्या पोकळ्या अंशतः बंद होणे.[]

सी-सेक्शन नंतरच्या जोखमींमुळे शल्यक्रियेच्या वेळेच्या आसपास सर्व स्त्रियांना प्रतिबंधात्मक ॲम्पिसिलिन सारख्या प्रतिजैविक मात्रेची शिफारस केली आहे. सिद्ध झालेल्या जंतुसंसर्गावरील प्रतिजैविकांसह उपचार अनेक लोकांना दोन ते तीन दिवसांमध्ये सुधारतात. सौम्य आजार असलेल्यांना मौखिक प्रतिजैविके वापरली जाऊ शकतात, अन्यथा शिरेच्या आतील प्रतिजैविकांची शिफारस केली जाते. सामान्य प्रतिजैविकांमध्ये योनीतून प्रसूती झाल्यानंतर ॲम्पिसिलिन आणि जेंटामायसिनचे एकत्रीकरणाचा समावेश असतो किंवा सी-सेक्शन झालेल्यांसाठी क्लिंडामायसिन आणि जेंटामायसिनचा समावेश असतो. योग्य उपचारांसह सुधारणा होत नसलेल्यांमध्ये गळूसारख्या इतर गुंतागुंतींचा विचार करायला लागतो.[]

जगाच्या विकसित भागात सुमारे एक ते दोन टक्के लोकांना योनीतून प्रसूती झाल्यानंतर गर्भाशयाचे जंतुसंसर्ग विकसित होतात. अधिक अवघड प्रसूती असलेल्यांमध्ये हे प्रमाण पाच ते तेरा टक्के असे वाढते आणि प्रतिबंधात्मक प्रतिजैविकांच्या वापरापूर्वी सी-सेक्शन असलेल्यांमध्ये हे प्रमाण पन्नास टक्के असे वाढते. [] या जंतुसंसर्गांमुळे १९९० साली झालेल्या ३४,००० मृत्यूंची संख्या कमी होऊन २०१३ मध्ये ती २४,००० वर आली.. [] सामान्य युगाच्या ५व्या शतकात हिप्पोक्रेट्सच्या लिखाणांमध्ये या स्थितीची पहिली ज्ञात असलेली वर्णने आढळतात.[] कमीत कमी १८व्या शतकापासून ते १९३० साली प्रतिजैविकांची ओळख होईपर्यंत हे जंतुसंसर्ग हे बाळाच्या जन्माच्या वेळी मृत्यू होण्याचे खूप सामान्य कारण होते.[] १८४७मध्ये ऑस्ट्रियात, इग्नाझ सेमेलवेस यांनी क्लोरीनयुक्त साबणाने हात धुण्याचा कसून वापर केल्यामुळे या रोगापासून होणारे मृत्यू वीस टक्क्यांवरून दोन टक्क्यांपर्यंत घसरले.[][]

संदर्भ

  1. ^ a b c d "37". Williams obstetrics (24th ed.). McGraw-Hill Professional. 2014. pp. Chapter 37. ISBN 9780071798938.
  2. ^ Hiralal Konar (2014). DC Dutta's Textbook of Obstetrics. JP Medical Ltd. p. 432. ISBN 9789351520672.
  3. ^ GBD 2013 Mortality and Causes of Death, Collaborators (17 December 2014). "Global, regional, and national age-sex specific all-cause and cause-specific mortality for 240 causes of death, 1990-2013: a systematic analysis for the Global Burden of Disease Study 2013". Lancet. doi:10.1016/S0140-6736(14)61682-2. PMID 25530442.
  4. ^ Walvekar, Vandana (2005). Manual of perinatal infections. New Delhi: Jaypee Bros. p. 153. ISBN 9788180614729.
  5. ^ Magner, Lois N. (1992). A history of medicine. New York: Dekker. pp. 257–258. ISBN 9780824786731.
  6. ^ Anderson, BL (April 2014). "Puerperal group A streptococcal infection: beyond Semmelweis". Obstetrics and gynecology. 123 (4): 874–82. PMID 24785617.
  7. ^ Ataman, AD; Vatanoglu-Lutz, EE; Yildirim, G (2013). "Medicine in stamps-Ignaz Semmelweis and Puerperal Fever". Journal of the Turkish German Gynecological Association. 14 (1): 35–9. PMID 24592068.