प्रशांत दळवी
प्रशांत ज्ञानदेव दळवी याच्याशी गल्लत करू नका.
प्रशांत दळवी हे एक मराठी नाटककार व चित्रपट-कथालेखक आहेत. पाश्चात्त्य नाटककारांकडून स्फूर्ती घेऊन त्यांनी मराठीत असंगत नाट्येही लिहिली आहेत.
अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर या प्रशांत दळवी यांच्या पत्नी आहेत. त्यांना रुंजी नावाची एक कन्या आहे.
प्रशांत दळवी यांनी लिहिलेली नाटके
- गेट वेल सून
- चारचौघी
- चाहूल
- ध्यानीमनी
- सेलिब्रेशन
प्रशांत दळवी यांची कथा किंवा पटकथा असलेले चित्रपट
- आजचा दिवस माझा
- कदाचित
- तुकाराम
- दुसरी गोष्ट (संवादलेखन)
- निशाणी डावा अंगठा
प्रशांत दळवी यांना मिळालेले पुरस्कार
- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा बाल गंधर्व पुरस्कार
- जयवंत दळवी पुरस्कार
- दगड का माती’ या प्रायोगिक नाटकाच्या नाट्यलेखनासाठी नाट्यदर्पण पुरस्कार