Jump to content

प्रवीण बांदेकर

प्रवीण दशरथ बांदेकर हे एक मराठी साहित्यिक आहेत. ’नवाक्षर दर्शन’ या वाङ्मयीन ‍‍मराठी नियतकालिकाचे ते संंस्थापक असून त्याचे ते अनेक वर्षे संपादक आहेत. अनेक वाङ्मयविषयक चर्चासत्रांंमधून ते अभ्यासपूर्ण शाेधनिबंधांचे वाचन करीत असतात.[ संदर्भ हवा ]

प्रवीण बांदेकर यांचे मूळ गाव बांदा असले तरी त्यांचा जन्म आजोळी वेंगुर्ल्याला झाला होता. (20 मार्च, 1966).[ संदर्भ हवा ] वडील कृषिखात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या बदलीनिमित्त दर दोन-चार वर्षांनी प्रवीण बांदेकर यांना कोकणातील गावोगाव फिरता आले. तरीसुद्धा वेंगुर्ल्याशी त्यांची अतूट नाळ जुळली. प्रवीण बांदेकर यांचे महाविद्यालयीन शिक्षणही वेंगुर्ल्यातल्या बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयात झाले. तिथेच त्यांना कवी गुरुनाथ धुरी भेटले त्यांनी त्यांची साहित्याची आवड जोपासली.[ संदर्भ हवा ]

नंतर इंग्रजीत एम.ए. करायला बांदेकर गोवा विद्यापीठात गेले आणि तिथे त्यांना साहित्यिक भालचंद नेमाडे भेटले. नेमाडेंमुळे बांदेकरांचे साहित्याचे-विचारांचे क्षितिज व कक्षा आणखीनच रुंदावल्या. शिक्षण पूर्ण होताच बांदेकर सावंतवाडीच्या आर.पी.डी. काॅलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि सावंतवाडीतील सर्जनशीलतेला खतपाणी घालणाऱ्या वातावणामुळे प्रवीण बांदेकर यांच्यातल्या कवी-लेखकाचा तेथे खरा विकास झाला.[ संदर्भ हवा ]

कवी वसंत सावंत, संवादी कविमित्र वीरधवल परब, अजय कांडर, शरयू आसोलकर, गोविंद काजरेकर आणि अनिल धाकू कांबळी ही मंडळी बांदेकरांना सावंतवाडीतच भेटली. वसंत सावंत यांनी स्थापन केलेला ‘सिंधुदुर्ग साहित्य संघ’ हेच या बहुतेकांचे पहिले साहित्यिक व्यासपीठ होते. बांदेकरांनी पहिली कविता या साहित्य संघाच्या मंचावरच वाचली होती.[ संदर्भ हवा ]

संस्थात्मक कार्य

अध्यक्ष- अनुष्टुभ प्रतिष्ठान, मुंबई[ संदर्भ हवा ] अध्यक्ष - सिंधुदुर्ग साहित्य संघ, सावंतवाडी[ संदर्भ हवा ] कार्याध्यक्ष - श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी[ संदर्भ हवा ] संपादक - साप्ताहिक वैनतेय[ संदर्भ हवा ]

साहित्य[ संदर्भ हवा ]

1. येरू म्हणे (कविता संग्रह), 2000 2. खेळखंडोबाच्या नावानं... (दीर्घ कविता), 2005 3. घुंगूरकाठी (ललित लेख), 2009 4. चाळेगत (कादंबरी), 2009 5. उजव्या सोंडेच्या बाहुल्या (कादंबरी), 2016 6. इंडियन ॲनिमल फार्म (कादंबरी), 2019 7. चिंटू चुळबुळे (बालसाहित्य), 1993 8. हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध (ललित), 2019 9. चिनभिन (कविता संग्रह), 2021

पुरस्कार

1. संजीवनी खोजे पुरस्कार (येरू म्हणे,), 2001 2. महाराष्ट्र शासनाचा इंदिरा संत पुरस्कार (येरू म्हणे), 2001 3. को.म.सा.प.चा आरती प्रभू पुरस्कार (येरू म्हणे ), 2001 4. अनुष्टुभ प्रतिष्ठान, मुंबईचा विभावरी पाटील पुरस्कार, (चाळेगत), 2010 5. भैरू रतन दमाणी पुरस्कार, सोलापूर (चाळेगत), 2010 6. विखे पाटील पुरस्कार, प्रवरानगर,(उजव्या सोंडेच्या बाहुल्या) 2017 7. मराठवाडा साहित्य परिषदेचा बी. रघुनाथ कादंबरी पुरस्कार, 2017 8. महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार, अमेरिका, 2018 9. आचार्य अत्रे पुरस्कार, बेळगाव, 2019 10. पाॅप्युलर प्रकाशनचा गंगाधर गाडगीळ पुरस्कार, 2019

  • आचार्य अत्रे पुरस्कार, बेळगाव, २०१९
  • इचलकरंजी वाचनालयाचा इंदिरा संत पुरस्कार, २००१
  • पाॅप्युलर प्रकाशन, मुंबईचा गंगाधर गाडगीळ पुरस्कार, २०१९
  • शब्द पब्लिकेशन, मुंबईचा बाबूराव बागूल पुरस्कार, २०१०
  • सोलापूरचा ‘भैरुरतन दमाणी’ पुरस्कार, २०१०
  • महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, २०१८
  • पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील (प्रवरानगर) पुरस्कार, २०१७
  • अनुष्टुभ प्रतिष्ठान, मुंबईचा ‘विभावरी पाटील’ पुरस्कार, २०१०
  • संजीवनी खाेजे प्रतिष्ठानचा कवयित्री संजीवनी खाेजे पुरस्कार, २००१
  • भंवरलाल जैन प्रतिष्ठान, जळगाव यांचा ना.धों. महानोर पुरस्कार, 2022
  • साहित्य अकादमी पुरस्कार, नवी दिल्ली, 2022