Jump to content

प्रवीण अनंत दवणे

प्रा. प्रवीण दवणे ( ६ एप्रिल १९५९) हे मराठी लेखक, गीतकार, पटकथालेखक आहेत. ते ’ज्ञानसाधना महाविद्यालया’त प्राध्यापक होते तेथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ लेखनाकडे वळले.

प्रवीण दवणे हे ठाणे शहराचे रहिवासी आहेत. त्यांनी २०००हून अधिक गीते लिहिली आहेत, आणि ती लता मंगेशकर, आशा भोसले,पंडित जितेंद्र अभिषेकी, सुमन कल्याणपूर,सुलोचना चव्हाण, श्रीधर फडके,साधना सरगम, सुरेश वाडकर, शंकर महादेवन अशा अनेक दिग्गज गायकांनी गायली आहेत.

प्रवीण दवणे उत्तम वक्ते आहेत. ‘दिलखुलास’, ‘सावर रे!’ ' वय वादळ विजांचं', ' माझ्या लेखनाची आनंदयात्रा ' हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले असून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

प्रवीण दवणे यांची आजपर्यंत ११०हून अधिक पुस्तके व कविता संग्रह प्रकाशित केले आहेत.

पुस्तके

त्यांची ' दिलखुलास ',' सावर रे!', ' थेंबातले आभाळ ' ' रे जीवना ' ,जाणिवांच्या ज्योती, आनंदोत्सव, ' देहधून ', 'द्विदाल ', 'सप्न बघा स्वप्न जगा ' ही पुस्तके फार नावाजली गेली आहेत.

प्रकाशित साहित्य

जडे जीव ज्याचा
नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अजिंक्य मीबालसाहित्यनवचैतन्य प्रकाशन
अत्तराचे दिवसललितलेखमंजुल प्रकाशन
अध्यापन आणि नवनिर्मितीलेखसंग्रहनवचैतन्य प्रकाशन
अपूर्वसंचितललित लेखसंग्रहनवचैतन्य प्रकाशन
अलगुजकथासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
आनंदाचे निमित्तकवितासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
आनंदोत्सवव्यक्तिचित्रणेमेनका प्रकाशन
आर्ताचे लेणेकवितासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
आयुष्य बहरतानाकथानवचैतन्य प्रकाशन
एकांताचा डोहकथानवचैतन्य प्रकाशन
ऐक जरानाकथानवचैतन्य प्रकाशन
कवी गोविंदाग्रज यांच्या कवितांचे निरूपण| नवचैतन्य प्रकाशन
कुणासाठी कुणीतरीकथासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
गरुडपंखी दिवसललितनवचैतन्य प्रकाशन
गाणारे क्षणललितसुरेश एजन्सी
गाणे गा रे पावसाबालकवितानवचैतन्य प्रकाशन
गाणे स्वातंत्र्याचेबालकवितीनवचैतन्य प्रकाशन
घडणाऱ्या मुलांसाठीमार्गदर्शनपरनवचैतन्य प्रकाशन
चेहरा अंधाराचाकथामंजुल प्रकाशन
चैतन्यरंगकथानवचैतन्य आणि मंजुल प्रकाशन
जंतर मंतर पोरं बिलंदरबालसाहित्यनवचैतन्य प्रकाशन
जाणिवांच्या ज्योतीसामाजिकनवचैतन्य प्रकाशन
जिवाचे आकाशललितनवचैतन्य प्रकाशन
जिव्हाळ्याचे आरसेकथासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
जीवनरंगललितनवचैतन्य प्रकाशन
जीवश्चकंठश्च!!पुलं, गदिमा साहित्य निरूपणनवचैतन्य प्रकाशन
थेंबातले आभाळनवचैतन्य प्रकाशन
दत्ताची पालखीकवितासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
दिलखुलासललितनवचैतन्य प्रकाशन
देहधूनकथानवचैतन्य प्रकाशन
द्विदलकथामेनका प्रकाशन
ध्यानस्थकवितासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
नाचे गणेशुकवितासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
पद्मबंधकथासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
परीसस्पर्शसह्याद्री प्रकाशन
पाऊस पहिलाललितनवचैतन्य प्रकाशन
पिल्लूबालसाहित्यनवचैतन्य प्रकाशन
प्रकाशाची अक्षरेलेखसंग्रहनवचैतन्य प्रकाशन
प्रश्नपर्ववैचारिकनवचैतन्य प्रकाशन
प्रिय पपानाटकमंजुल प्रकाशन
फुलण्यात मौज आहेबालसाहित्यनवचैतन्य प्रकाशन
बोकाबालगीतेनवचैतन्य प्रकाशन
भूमीचे मार्दवकवितासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
मनाच्या मध्यरात्रीकथासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
मनातल्या घरातललितनवचैतन्य प्रकाशन
माझिया मनालेखनवचैतन्य प्रकाशन
मिश्किल आणि मुश्किलविनोदीनवचैतन्य प्रकाशन
मुक्तछंदमुद्रा प्रकाशन
मैत्रबनआठवणीनवचैतन्य प्रकाशन
मोठे लोक छोटे होते तेव्हाबालसाहित्यनवचैतन्य प्रकाशन
रंगमेधललितनवचैतन्य प्रकाशन
रुजवातबालगीतेनवचैतन्य प्रकाशन
रूप अरूपकादंबरीमंजुल प्रकाशन
रे जीवना!ललितनवचैतन्य प्रकाशन
विरामचिन्हेदिलीप प्रकाशन
शब्दांचा मोर भिजेकथासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
सातमजलीनवचैतन्य प्रकाशन
सावर रेललित लेखसंग्रह, भाग १ आणि २नवचैतन्य प्रकाशन
सूर्य पेरणारा माणूससाप्ताहिक विवेक
स्पर्शगंधकवितासंग्रहनवचैतन्य प्रकाशन
हार्दिक वाचकपत्रांच्या सोबतीने केलेली शब्दयात्राभाषाविषयकनवचैतन्य प्रकाशन
हे शहराकवितासंग्रहनवचैतन्य प्रकाशन

पुरस्कार

  • मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार (२४ एप्रिल २०११)
  • सर्वोत्कृष्ट वाडम़याचा महाराष्ट्र राज्यपुरस्कार ५ वेळा
  • ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा चैत्रबन पुरस्कार, मृत्युंजय प्रतिष्ठानचा शिवाजी सावंत पुरस्कार, अक्षर भारती पुणे यांचा कविश्रेष्ठ कुसुमाग्रज पुरस्कार, सार्वजनिक वाचनालय नाशिक यांचा डॉ. अ. वा. वर्टी पुरस्कार, पुणे ग्रंथालय पुणे संस्थेचा साहित्यसम्राट न. चिं. केळकर पुरस्कार वगैरे.

बाह्य दुवे