Jump to content

प्रवासी भारतीय दिवस

प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते.[] ह्याप्रIत्यर्थ २००३ सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. ह्याचे आयोजन भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय (Ministry of Overseas Indian Affairs) व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय (Ministry for Development of North Eastern Region), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांच्या मार्फत केले जाते. ७ ते ९ जानेवारी दरम्यान भारतामधील एखाद्या शहरात प्रवासी भारतीय दिवसानिमित्त अनेक सोहळे व कार्यक्रम आयोजिiत केले जातात.

२०१४ सालच्या बाराव्या प्रवासी भारतीय दिवसाला ५१ देशांमधील सुमारे १,५०० प्रतिनिधींनी हजेरी लावली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ह्यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

यादी

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ थरूर, शशी. "The Global Indian".

बाह्य दुवे