Jump to content

प्रयुत चान-ओ-चा

प्रयुत चान-ओ-चा
ประยุทธ์ จันทร์โอชา

थायलंडचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२२ मे २०१४
राजा भूमिबोल अदुल्यदेज
मागील यिंगलक शिनावत्रा

थायलंडचा लष्करप्रमुख
कार्यकाळ
१ ऑक्टोबर २०१० – ३० सप्टेंबर २०१४

जन्म २१ मार्च, १९५४ (1954-03-21) (वय: ७०)
नाखोन राचासिमा, थायलंड
राजकीय पक्ष अपक्ष
धर्म थेरवाद बौद्ध धर्म
सही प्रयुत चान-ओ-चायांची सही

प्रयुत चान-ओ-चा (थाई: ประยุทธ์ จันทร์โอชา; रोमन लिपी: Prayut Chan-o-cha ; जन्मः २१ मार्च १९५४) हा एक निवृत्त थाई लष्करी अधिकारी व थायलंडचा विद्यमान पंतप्रधान आहे. १९७२ पासून थायलंड लष्करामध्ये कार्यरत असलेला चान-ओचा २०१० ते २०१४ दरम्यान लष्करप्रमुखाच्या पदावर होता.

७ मे २०१४ रोजी थायलंडची तत्कालीन पंतप्रधान यिंगलक शिनावत्रा हिला थायलंडच्या उच्च न्यायालयाने सत्तेचा गैरवापर, भ्रष्टाचार इत्यादी आरोपांवरून सत्ता सोडण्याचा आदेश दिला. ह्या आदेशाचा फायदा घेऊन चान-ओचाने २२ मे २०१४ रोजी शिनावत्राविरोधात लष्करी बंड पुकारले व शिनावत्रा व तिच्या सहकाऱ्यांना अटक केले. चान-ओचाने स्वतःला पंतप्रधानपदावर नियुक्त केले व देशाच्या संविधानामध्ये तात्पुरते बदल करून देशाचे संपूर्ण नियंत्रण स्वतः कडे घेतले. तेव्हापासून त्याने अनेक विरोधकांना तुरूंगात डांबले असून थायलंडवर हुकुमशाही गाजवण्यास सुरुवात केली आहे.

संदर्भ

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे