Jump to content

प्रभात मुंबई (मराठी वृत्तपत्र)

२१ नोव्हेंबर १९२९ रोजी मुंबई येथून प्रभात वर्तमान पत्र सुरू झाले. पांडुरंग महादेव भागवत यांनी हे दैनिक सुरू केले . श्रीपाद शंकर नवरे यांनी संपादक पदाची धुरा सांभाळली. त्यांना मुंबईचे सार्वजनिक काका या नावाने ओळखले जाई .

इतिहास

मोज छापखानाचे मालक पांडुरंग महादेव भगवत यांनी प्रभातची मुहूर्त मेढ रोवली. ते जरी मालक असले तरी त्यांनी स्वतः कधी लेखन केले नाही. ते संपादकीय कामात कधी लक्ष घालीत नसत. आपल्या पत्राबाबत त्यांची स्वतःची एक धारणा होती, की आपले पत्र हे बहुजन समाजाचे पत्र असावे., त्यांनी ती शेवट पर्यंत कायम राखली. .[]

पहिला अंक

२१ नोव्हेंबर १९२९ साली प्रभातचा पहिला अंक प्रकाशित झाला. १६ नोव्हेंबर १९२९ च्या केसरी वर्तमान पत्रामध्ये या बाबतची जाहिरात देण्यात आली. या नंतर हे दैनिक २१ वर्ष चालले .

संपादकीय मंडळ

वर्तमानपत्रावर पांडुरंग महादेव भागवत यांचे नाव संपादक म्हणून छापले जाई. संपादक मंडळात त्यांच्याखेरीज श्रीपाद शंकर नवरे, अच्युतराव कोल्हटकर, काशिनाथ केळकर ही मंडळी होती.

संदर्भ

  1. ^ लेले, रा.के. (१९७४). मराठी वृत्तपत्रांचा इतिहास. कॉंटिनेंटल प्रकाशन.