Jump to content

प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार

रंगभूमिविषयक कामासाठी दिला जाणारा हा महाराष्ट्र सरकारचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार आहे. या पुरस्काराच्या नावात पूर्वी प्रभाकर पणशीकर हे शब्द नव्हते. तेव्हा हा पुरस्कार खुद्द प्रभाकर पणशीकरांनाच २००६ साली दिला गेला होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नावाने हा पुरस्कार आत्तापर्यंत विजया मेहता(२००७), भालचंद्र पेंढारकर(२००८), मधुकर तोरडमल (२०१०), सुलभा देशपांडे(२००९), सुधा करमरकर (२०११), आत्माराम भेंडे(२०१२), अरुण काकडे (२०१३), श्रीकांत मोघे (२०१४), रामकृष्ण नायक (२०१५), लीलाधर कांबळी (२०१६), बाबा पार्सेकर (२०१७) आणि जयंत सावरकर (२०१८) याना दिला गेला. हा पुरस्कार अतिशय मानाचा समजला जातो. या पुरस्काराचे स्वरूप हे मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ आणि पाच लाख रुपये रोख असे आहे.