प्रभाकर त्रिविक्रम वैद्य
प्रभाकर त्रिविक्रम वैद्य यांचा जन्म १९३० रोजी कुंकळी मालसेट येथे झाला. प्रभाकर १९४६ च्या सत्याग्रहात होते. आझाद गोमंतक दलाचे ते सदस्य होते. गोवा मुक्ति संग्रामात उतरल्यावर लोक जागृतीसाठी व पोर्तुगीजांविरुद्ध बंद करण्यासाठी त्यांनी अनेक प्रभात फेऱ्या काढल्या. दत्ताराम उत्तम देसाई या क्रांतिकारकाशी त्यांची ओळख होती. जानेवारी १९५५ ला त्यांना पहिल्यांदा अटक झाली. रेल्वे पुलावर केल्या गेलेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये त्यांचा सहभाग होता.लढवय्या वृत्तीच्या या वीराने १९५५ मध्ये खाणीवर हल्ला केला.यामुळे प्रादेशिक लवादासंदर्भात २३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा झाली.[१]
- ^ शहासने, चंद्रकांत (2012). देशभक्त कोश. कोथरूड पुणे: बहुजन साहित्यधारा.