प्रभाकर ताकवले
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सासवड (ता.पुरंदर) येथे पत्रकार दशरथ यादव यांच्या संकल्पनेतून छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन घेण्यास सुरुवात झाली. संभाजीराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. त्यांनी नायिकाभेद, नखशिखांत, सातशतक, बुद्धभुषण हे चार ग्रंथ लिहिले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना मराठी, संस्कृत, हिंदी, फारशी, प्राकृत, इंग्रजी, अर्धमागधी, फ्रेंच या भाषा लिहिता व बोलता येत होत्या. ते उतम साहित्यिक व प्रशासक राजे होते.. डाॅ. प्रभाकर ताकवले हे संस्कृत पंडित असून, छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला बुधभुषण ग्रंथ त्यांनी मराठीत अनुवादित केला आहे. ते मुळचे हरगुडे (ता. पुरंदर) येथील असून, पुणे विद्यापीठीत ज्ञानदानाचे काम करीत होते. सासवड येथील पहिल्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.