Jump to content

प्रभाकर करंदीकर

प्रभाकर बापू करंदीकर हे एक मराठी लेखक आहेत.

अन्य कारकीर्द

ते १९७३ ते २००७ पर्यंत भारतीय प्रशासकीय सेवेत होते. ते सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि पुण्याचे विभागीय कमिशनर होते. त्या काळात त्यांनी अनेक सरकारी आणि बिनसरकारी स्वयंसेवी संस्थांबरोबर काम केले. निवृत्तीनंतर त्यांनी २००७ ते २०१० या काळात महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीत ‘कंपनी सल्लागार’ म्हणून काम केले. पुढे त्यांनी फिनोलेक्स ग्रुप ऑफ कंपनीचे आर्थिक सल्लागार म्हणून आणि अन्य ७ सरकारी आणि खासगी कंपन्यांचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणे सुरू केले.

प्रभाकर (बापू) करंदीकर हे पुणे विद्यापीठाचे एम.ए. असून त्यांनी लंडन स्कूल ऑफ एकॉनिमिक्समधून एम.एस. केले आहे. ते महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (MIDC)चे मुखत व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ (State Industrial & Investment Corporation Of Maharashtra Limited-SICOMचे) व महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे (STचे) मुख्य कार्यकारी अधिकारी होते. निवृत्तीनंतर करंदीकर हे आधी २९जून २०१० पासून श्रीराम ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे बोर्डाध्यक्ष आणि ३ मे २०१२ पासून स्वतंत्र गैरकार्यकारी संचालक झाले.

  • रिमांड होम, रेड क्रॉस सोसायटी, दमाणी रक्तपेढी, कुष्ठरोग निवारण संस्था, प्राणी क्रूरता निवारण संस्था (Prevention of Cruelty to Animals Society), International Year of Children Trust., राजा केळकर संग्रहालय, महात्मा फुले संग्रहालय (पूर्वीचे रे म्य़ुझियम), राज्य कर्मचारी क्रीडा आणि संस्कृती न्यास, आदी संस्थांचे एक्स-ऑफिशिओ (पदसिद्ध) अध्यक्ष.
  • सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलचेचे कार्यकारी संचालक मंडळाचे प्रमुख आहेत. वगैरे वगैरे.

पुस्तके

  • आदिबंध (कादंबरी) : 'आदिबंध' कादंबरीमध्ये आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांची कार्यपद्धती, त्यातली पात्रे, त्यांची भाषा पाहायला मिळते.
  • उजवण (कादंबरी)
  • फिरुनी नवी जन्मले मी (अरुणिमा सिन्हाची विलक्षण जीवनकहाणी)