प्रबुद्ध साहित्य संमेलन
नागपूर येथे अखिल भारतीय प्रबुद्ध साहित्य परिषदेचे चौथे द्विदिवसीय अखिल भारतीय प्रबुद्ध साहित्य संमेलन १४ व १५ जानेवारी २०१२ या कालावढीत करुणा भवन, बजाजनगर येथे झाले. संमेलनाचे आयोजक महाराष्ट्र राज्य कास्ट-ट्राइब कर्मचारी कल्याण महासंघ आहे. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बौद्धाचार्य शांतिस्वरूप बौद्ध (दिल्ली) हे होते. महासंघाचे मुख्य संघटक अरुण गाडे स्वागताध्यक्ष होते.
उद्घाटनापूर्वी सकाळी ८ वाजता दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर वर्धापनदिनानिमित्त भीमसैनिकांना मानवंदना देण्यात आली. ९ वाजता बुद्ध भीमगीते सादर करण्यात आली.
संमेलनाच्या उद्घाघाटनप्रसंगी लक्ष्मण माने, ब्रिगेडियर सुधीर सावंत, अशको सरस्वती, टेक्सास गायकवाड आदी उपस्थित होते. आहेत. दोन दिवसांच्या या संमेलनात पथनाट्य, परिसंवाद, प्रबुद्ध कविसंमेलन, बालकांसाठी संवाद, जलसा आदी कार्यक्रम आयोजिण्यात आले होते.
संमेलनाचा समारोप १५ जानेवारीला सायं. ५ वाजता उत्तमराव खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
हे सुद्धा पहा
- साहित्य संमेलने
- दलित संस्था