प्रबाहु
प्रबाहु एक कठोर संरचनात्मक घटक आहे ज्यात एक आडवे विस्तारित भाग केवळ एका टोकाला आधृत असत. सामान्यत: ते एका भिंतीसारख्या सपाट उभ्या पृष्ठभागापासून विस्तारते, ज्यास ते दृढपणे जोडलेले असणे आवश्यक असते. इतर स्ट्रक्चरल घटकांप्रमाणेच एक प्रबाहु बीम, प्लेट, ट्रस किंवा स्लॅब म्हणून तयार केली जाऊ शकते.
जेव्हा याच्या दूरच्या, अनाधृत टोकावर संरचनात्मक भार दिला जातो, तेव्हा प्रबाहु आधृतस्थळावर भार टाकतो जेथे तो एक कर्तर प्रतिबल आणि नमन आघूर्ण लागू होतो. [१]
प्रबाहु बांधकामात अतिरिक्त आधार नसलेले अधांतरी संरचना बनविण्यास मुभा देतो.
संदर्भ
- ^ Hool, George A.; Johnson, Nathan Clarke (1920). "Elements of Structural Theory - Definitions". Handbook of Building Construction (Google Books). vol. 1 (1st ed.). New York: McGraw-Hill. p. 2. 2008-10-01 रोजी पाहिले.
A cantilever beam is a beam having one end rigidly fixed and the other end free.