Jump to content

प्रफुल्लचंद्र विष्णू साने

प्रफुल्लचंद्र विष्णू साने (१९३७ -) हे भारतीय आण्विक जीवशास्त्रज्ञ आणि वनस्पती फिजिओलॉजिस्ट आहेत. त्यांना प्रकाशसंश्लेषण विषयातील अग्रगण्य अभ्यासक समजले जाते. ते नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी संचालक आणि इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस, इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस, नॅशनल अकॅडेमी ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस, आणि महाराष्ट्र अकॅडेमी ऑफ सायन्सेसचे निवडून फेलो आहेत. भारत सरकारची सर्वोच्च संस्था, वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने त्यांना १९८१ साली जैविक विज्ञानशास्त्रातील योगदानाबद्दल शांती स्वरूप भटनागर पुरस्कार दिला.