प्रफुल्ल वानखेडे
गेल्या दोन दशकांपासून औष्णिक ऊर्जा, विविध इंधनांचे सुरक्षित ज्वलन, ऊर्जा संवर्धन या क्षेत्रांतील एक सुपरिचित नाव म्हणजे 'केल्व्हिन व लिक्विगॅस' कंपनी. या कंपनीसह अन्य पाच कंपन्यांचे संस्थापक व अध्यक्ष प्रफुल्ल वानखेडे हे आहेत.[१] भारतात आणि १८ देशांत त्यांच्या कंपन्या व्यवसाय करतात.[२]
सर्वसामान्य मराठी कुटुंबात जन्मलेल्या प्रफुल्ल वानखेडे यांच्याकडे उद्योगाचा परंपरागत वारसा नव्हता; भांडवल उभे करायला कुठले बळ नव्हते. अशा आव्हानात्मक आणि विपरीत परिस्थितीतही संधी शोधत प्रफुल्ल यांनी उद्योग उभा केला, वाढवला.
टाटा, महिंद्र, वेदांता, बजाज, एलअँडटी, गोदरेज, सिमेन्स, केलॉग्स, मर्सिडीज बेंझ, आयटीसी, ब्लूस्टार, आयशर व्होल्वो, आर्सेलर मित्तल, पार्ले, कमिन्स, ब्रिटानिया, सिप्ला, कोलगेट, डाबर, बाटा, हिल्टन तसेच एचपीसीएल, आयओसीएल या इंधन क्षेत्रातील बलाढ्य अशा भारतीय आणि मल्टिनॅशनल कंपन्या त्यांचे नियमित ग्राहक आहेत.[३]
इंधन ज्वलन क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान, नियम व मानदंड भारतात प्रस्थापित करण्यात प्रफुल्ल यांचा महत्त्वाचा वाटा आहे. ते केंद्र सरकारच्या BIS कमिटीतील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या तांत्रिक समितीचे, तसेच जागतिक एलपीजी असोसिएशनचे सदस्य आहेत.[४]
सोशल मिडीयाच्या जगात जिथं लोक मनोरंजनात व्यग्र आहेत तिथं प्रफुल्ल आर्थिक साक्षरता आणि उद्यमशीलतेचे धडे देत असतात. लेट्स रीड इंडिया या सशक्त वाचन चळवळीचे ते प्रणेते आहेत.[५]
योग्य पद्धतीने पैसे मिळवणं, वाढवणं आणि समृद्ध जगण्यासाठी तो खर्च करणं यासाठी मूल्य, संस्कार रुजवण्याचे काम प्रफुल्ल वानखेडे अथक करत असतात. कोरोनामुळे सुरू झालेल्या टाळेबंदीमध्ये त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेविषयीचे आपले विचार मांडायला सुरुवात केली. त्यांचा या ट्वीटर सिरीजला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आर्थिक साक्षरतेवर त्यांनी सकाळच्या अवतरण पुरवणीमध्ये लेख लिहिण्यास सुरुवात केली. त्याच लेखाचे एकत्रीकरण करत पुढे त्यांनी 'गोष्ट पैशापाण्याची’ हे पुस्तक लिहिले. सर्वसामान्य जनतेला आर्थिक साक्षरतेचे धडे देणाऱ्या गोष्ट पैशापाण्याची या पुस्तकाने अनेक विक्रम केले.[६]
- पहिल्याच दिवशी जगप्रसिद्ध हॅरी पॅाटर या पुस्तकांच्या बुकींगचा विक्रम मोडला. काही तासातच हजारो प्रतींचे प्रीबुकींग.[७]
- प्रकाशनपूर्व पुस्तकांचे ऑर्डर बुकिंग - १८००० पेक्षा जास्त
- मराठी मध्ये पहिलीच आवृत्ती तीस हजारांची येण्याची पहिलीच वेळ [८]
- प्रकाशनानंतर पंधरा दिवसातच ३० हजांर प्रतींची विक्री, आणि महिन्याभरात ६० हजार पुस्तकं बाजारात येण्याची मराठी साहित्याततील पहिलीच घटना. [९]
- आता ६० हजारांची दुसरी आवृत्तीही संपलीये. तिसरी आवृत्ती ४० हजारांची आणि तीनच महिन्यात लाखभर प्रती बाजारात येण्याचा अजून एक नवा विक्रम.[१०]
- मराठीसह ९ भाषांमध्ये भाषांतरीत होणारे पुस्तक
- मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक तब्बल १२१ देशांत प्रकाशित झाले.[ संदर्भ हवा ]
- या पुस्तकासाठी प्रसिद्ध विचारवंत, लेखक, उद्योजक, मान्यवर, शास्त्रज्ञ यांच्या प्रतिक्रिया लाभल्या. पदमविभूषण डॅा. माशेलकर सर, उद्योजक व परसिस्टंटचे फाऊंडर तथा चेरमन आनंद देशपांडे यांनी यासाठी प्रस्तावना लिहीली आहे.[११]
इंग्रजी पुस्तकासाठी भारतरत्न डॅा.अब्दुल कलाम साहेब यांचे सहकरी तसेच इंग्रजी पुस्तक विंग्ज ऑफ फायर चे लेखक जे मराठीत अग्निपंख या नावाचे भाषांतारीत झाले आहे अशा व अनेक पुस्तकांचे जेष्ठ लेखक, प्रसिद्ध मिसाईल शास्त्रज्ञ अरुण तिवारी हे या पुस्तकाबद्दल म्हणतात,"हे पुस्तक वाचून मला जणू काही माझे गुरू दिवंगत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याशी संवाद साधत असल्याचीच अनुभूती मिळाली. एका उणीवेची जाणीव', संकटांकडे एक आव्हान म्हणून पाहण्याची शिकवण देनारे' असावा संकटांचाही अंदाज', आणि मानवी संपत्तीचे महत्त्व समजावून सांगणारे 'माणुसकीची श्रीमंती' अशी प्रकरणे वाचताना तरुण कलामांनी केलेली चिरंतन मूल्यांची मांडणी पुन्हा नव्याने वाचत असल्याचा भास होतो."[ संदर्भ हवा ]
संदर्भ
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "केल्व्हिन".
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "लिक्विगॅस".
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "इंधन क्षेत्रातील ग्राहक".
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "प्रफुल्ल वानखेडे".
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "लेट्स रीड इंडिया".
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "अवतरण सकाळ".
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "हजारो प्रतींची विक्री".
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "तीस हजार प्रती".
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "साठ हजार प्रती".
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "तिसरी आवृत्ती".
- ^ वानखेडे, प्रफुल्ल. "मान्यवरांच्या प्रतिक्रिया".