प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजना
अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना महाराष्ट्र राज्यात ०१/१२/२०१८ पासून राबवण्यास सुरुवात झाली.[१]
२ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबाला प्रती हप्ता रुपये २००० म्हणजेच वार्षिक ६००० अर्थसाह्य दिले जाते.
या योजनेत पुढे केंद्र सरकारने बदल करून सरसकट सर्वांना या योजनेचा लाभ देण्याचे आदेश देण्यात आले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेंतर्गत केंद्र शासनाने निकष शिथिल केल्याने लाभार्थी शेतकरी कुटुंबांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. शेतकरी कुटुंबासाठी दोन हेक्टरची मर्यादा रद्द केल्याने सरसकट शेतकरी कुटुंबे योजनेसाठी पात्र ठरली आहेत.
तपशील | योजना तपशील |
---|---|
योजनेचे नाव | पीएम किसान सन्मान निधी योजना |
लाभार्थी | भारतीय शेतकरी |
लाभ रक्कम | ₹6000 प्रति वर्ष |
लाभार्थ्यांची संख्या | 14.5 करोड़ |
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट | Click here Archived 2020-04-22 at the Wayback Machine. |
योजनेचा उद्देश्य | लहान शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे. |
[२] अट शिथिल केल्यामुळे राज्यातील सव्वा कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे.
अपात्र लाभार्थी कोणकोणते आहेत?
जमीन धारण करणारी संस्था
संवेधानिक पद धरण केलेली आजी माजी व्यक्ती
आजी माजी सर्व मंत्री
आजी माजी आमदार खासदार
आजी माजी महापौर जि. प.अध्यक्ष
आयकर भरणारी व्यक्ती
निवृत्ती वेतन १०००० पेक्षा जास्त घेणारी व्यक्ती
नोंदणीकृत डॉक्टर वकील अभियंता
पंतप्रधान किसान सन्मान निधी "साठी नोंदणी कशी करावी?
* प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2020 साठी अर्ज कसा करावा? या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अर्ज करू इच्छित देशातील इच्छुक लाभार्थींनी खाली दिलेल्या पद्धतीचे पालन करून या योजनेचा लाभ घ्यावा.
- सर्व प्रथम, अर्जदारास योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ संगणकाच्या स्क्रीनवर तुमच्यासमोर उघडेल.
- या मुख्य पृष्ठावर आपल्याला "[शेतकरी कॉर्नर]" हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा, या पर्यायामध्ये तुम्हाला आणखी तीन पर्याय दिसतील.
- यापैकी तुम्हाला “[नवीन शेतकरी नोंदणी]” या पर्यायावर क्लिक करावे लागेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म उघडेल.
- या फॉर्ममध्ये आपल्याला आपला आधार नंबर, प्रतिमा कोड भरावा लागेल आणि विचारलेल्या सर्व माहिती पूर्ण कराव्या लागतील.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- पुढे, नोंदणी फॉर्मची एक प्रिंट आउट घ्या आणि भविष्यासाठी जतन करा.
- अशा प्रकारे आपला अर्ज पूर्ण होईल.
== अधिक माहितीसाठी ==2019 नंतर खरेदीखत झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू आहे का