Jump to content

प्रदीप भिडे

प्रदीप भिडे
मृत्यू ७ जून, २०२२
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा वृत्तनिवेदक
जोडीदार सुजाता
वडील जगन्नाथ
आई शुभलक्ष्मी

प्रदीप भिडे हे एक प्रसिद्ध मराठी वृत्तनिवेदक होते.[] मुंबई दूरदर्शनवर त्यांनी १९७४ पासून कृष्णधवल काळापासून सुमारे ३५ वर्षांहून अधिक काळ वृत्तनिवेदन केलं. सुरुवातीला त्यांनी दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्यांसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केले. पुढे सह्याद्री वाहिनीच्या निर्मितीनंतर त्यांनी सह्याद्री वाहिनीसाठी वृत्तनिवेदनाचे काम केले. दूरदर्शनच्या बातम्यांचा चेहरा अशी अमीट ओळख असलेले भिडे आपला भारदस्त आवाज , सुस्पष्ट उच्चार आणि प्रसन्न व्यक्तिमत्वामुळे लोकप्रिय होते. ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असा सर्वपरिचीत आवाज असणारे ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं ७ जून, २०२२ रोजी मुंबईत वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं.[][][]

विज्ञान शाखेमधून शिक्षण घेतल्यानंतर प्रदिप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. प्रदिप भिडे यांनी ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसपर्क अधिकारी म्हणून काम केलं. मुंबई दूरदर्शनच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी म्हणजेच १९७४ साली ते दूरदर्शनमध्ये आले.[] भिडे यांना नाटकाचीही पार्श्वभूमी होती. त्यांनी रंगमंचावर काही नाटकांमधूनही भूमिका केल्या होत्या. अनेक व्यावसायिक जाहिरातींमध्ये त्यांनी आपल्या दमदार आवाजानं अमीट छाप उमटवली होती. प्रदीप भिडे यांनी आतापर्यंत पाच हजारांहून अधिक जाहिराती , माहितीपट, आणि लघुपटांना त्यांनी आवाज दिला असून अनेक कार्यक्रमांचं त्यांनी सूत्रसंचालन केलं. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या पहिल्या वर्षांपासून सलग सात-आठ वर्षे त्यांनीच सूत्रसंचालन केले. ‘पुणे फेस्टिव्हल’चा ‘उत्कृष्ट निवेदक’ हा पुरस्कारही त्यांना मिळाला.[]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ "ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे".
  2. ^ a b टीम, एबीपी माझा वेब (2022-06-07). "'आजच्या ठळक बातम्या' सांगणारा भारदस्त आवाज हरपला, वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन". marathi.abplive.com. 2022-06-08 रोजी पाहिले.
  3. ^ "ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन, माध्यमविश्वात हळहळ".
  4. ^ Jun 7, Bella Jaisinghani / TNN / Updated:; 2022; Ist, 20:51. "Legendary Mumbai Doordarshan newscaster Pradeep Bhide passes away at 68 | Mumbai News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-06-08 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  5. ^ "Pradeep Bhide Death : प्रदीप भिडे यांचं निधन; दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला". Loksatta. 2022-06-08 रोजी पाहिले.