Jump to content

प्रतिविंध्य

प्रतिविंध्य तथा श्रुतविंध्य हा महाभारतातील इंद्रप्रस्थाचा राजा युधिष्ठिर व राणी द्रौपदी यांचा पुत्र होता.

प्रतिविंध्य हा शक्रासमान (इंद्र) लढणारा योद्धा समजला जाई[]

कुरुक्षेत्राच्या युद्धात प्रतिविंध्याने कौरवांचा मामा शकुनीशी लढाई केली होती.[] युद्धाच्या नवव्या दिवशी याने अलंबुश यास बेशुद्ध केले. चौदाव्या रात्रीर प्रतिविंध्य आणि सुतसोम यांनी अश्वत्थामाचे आक्रमण थोपवून धरले परंतु द्रौणीच्या प्रतिहल्ल्यासमोर माघार घेतली. युद्धाच्या १६व्या दिवशी प्रतिविंध्याने अभिसारनरेश चित्र याचा वध केला

युद्धाच्या शेवटच्या रात्री दुर्योधनाच्या मृत्यूनंतर अश्वत्थामाने कृतवर्मा आणि कृपाचार्य यांच्यासह पांडवांवर निर्वाणीचा हल्ला चढवला. अंधारात झालेल्या या लढाईत आपल्या चार सावत्र भावांसह प्रतिविंध्य मृत्यू पावला.

  1. ^ "Prativindhya - AncientVoice".
  2. ^ Mahabharata Book Six (Volume 1): Bhishma. October 2016. ISBN 9781479852123.