पौषमेळा
पौष मेळा (बंगाली : পৌষ মেলা) हा बंगाल राज्यातील शांतिनिकेतन येथील वार्षिक आनंदोत्सव आहे.[१] यानिमित्त येथे जत्रेचे आयोजन केले जाते. सुगीच्या हंगामाचा आनंद घेणे हा या उत्सवाचा हेतू मानला जातो. बंगाली कालदर्शिकेनुसार पौष महिन्याच्या सातव्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होते. शांतिनिकेतन विद्यापीठात या निमित्ताने बंगाली लोक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या बाऊल, काव्यवाचन, नृत्य अशा कलांचे सादरीकरण आयोजित केले जाते.[२]
इतिहास
देवेंद्रनाथ ठाकूर यांनी आपल्या वीस अनुयायांसह ब्राह्मो समाजाचे सदस्यत्व स्वीकारले तो दिवस ७ पौष (२१ डिसेंबर १८४३) हा होता. या दिवसाचे स्मरण म्हणून मेळ्याचे आयोजन केले जाते. शांतिनिकेतन परिसरात ब्रह्मा मंदिराची स्थापना करण्यात आली (इ.स. १८९१) तो दिवसही ७ पौष हाच होता. या दिवशी एका मेळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर दरवर्षी येथे सार्वजनिक सांस्कृत उत्सव आयोजित केला जातो.[३]
स्वरूप
पौष मेळा उत्सवाची सुरुवात २३ डिसेंबरच्या आसपास होते. पहाटे सनई वादनाने सुरुवात होते. आश्रम परिसराला गायकांच्या प्रभातफेरीने प्रदक्षिणा केली जाते. यानंतर प्रार्थना होते. यानंतर पुढील सर्व दिवस बाऊल कलेचे सादरीकरण, लोककला सादरीकरण, आदिवासी खेळ यांचे आयोजन होते. शांतिनिकेतन येथे शिकत असलेले विद्यार्थी आपापल्या कलांचे सादरीकरणं करतात.[४] शेवटचा दिवस हा शांतिनिकेतन विद्यापीठाशी संबंधित सदस्यांसाठी राखीव असतो.
- जत्रा-
या उत्सवी जत्रेत सुमारे १५०० छोटी मोठी दुकाने असतात. स्थानिक कापड आणि हस्तकला यांची विक्री येथे केली जाते. वस्तूंच्या जोडीने खाद्यपदार्थ विक्री येथे केली जाते.[५]
हे ही पहा
चित्रदालन
- उत्सवातील दृश्य
- रात्रीचे दृश्य
- विजेचा पाळणा
संदर्भ
- ^ Dr.S.N.Pandey (2010-09). West Bengal General Knowledge Digest (इंग्रजी भाषेत). Upkar Prakashan. ISBN 978-81-7482-282-6.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Planet, Lonely; Benanav, Michael; Bindloss, Joe; Brown, Lindsay; Butler, Stuart; Elliott, Mark; Harding, Paul; Holden, Trent; Mahapatra, Anirban (2019-10-01). Lonely Planet India (इंग्रजी भाषेत). Lonely Planet. ISBN 978-1-78868-682-2.
- ^ Pearson, William Winstanley; Tagore, Rabindranath (2018-10-20). Shantiniketan: The Bolpur School of Rabindranath Tagore (इंग्रजी भाषेत). Creative Media Partners, LLC. ISBN 978-0-343-88107-8.
- ^ "Shantiniketan Poush Mela is Mirror to Folk Art & Culture in the Land of Rabindranath Tagore". Travel to India, Cheap Flights to India, Aviation News, India Travel Tips (इंग्रजी भाषेत). 2018-12-25. 2021-12-11 रोजी पाहिले.
- ^ "Poush (Pous) Mela, Santiniketan, Birbhum, West Bengal". Santiniketan (इंग्रजी भाषेत). 2021-12-11 रोजी पाहिले.