पोहेगाव
पोहेगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यातले एक गाव आहे. ह्या गावात एक प्राचीन गणपती मंदिर आहे. हा गणपती नवसाला पावणारा आहे म्हणून येथे दर अंगारकी चतुर्थीला हजारो भक्त दर्शनाला येतात. हे गणपती मंदिर नाशिक-शिर्डी रस्त्यापासून दीड किमी अंतरावर आहे.पोहेगाव पासून शिर्डी केवळ १५ किमी अंतरावर आहे.
आर्थिकः पोहेगाव हे आर्थिक दूष्ट्या विकसित व प्रगतशील गाव आहे .गावात मोठया प्रमाणात बाजारपेठ निर्माण झाली असून सदर गाव परिसरातील १५ ते २०गावांची दळणवळण व आर्थिक व्यवहार चालतात .तसेच गावात सहकारी तसेच शासकीय पतसंस्था व जी.प.शाळा ,माधयमिक शाळा व ज्युनिअर कॉलेज असल्याने सादर गावात आर्थिक प्रगती आहे. व्यवसायः शेती हा व्यवसाय पोहेगावत केला जातो .शेती बरोबर जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. प्राचीन काळ: गावात जुना ऐतिहासिक वाडा जळका वाडा गढी असून ऐतिहासिक वेस आहे. दळणवळण: वाहतूक पोहेगाव हे दळणवळणाच्या दृष्टीने अत्यत महत्त्वाचे आहे.कारण पुणे एम. आय.डी.सी.अंतर्गत होणाऱ्या वाहतूक पोहेगाव येथून होतात.तसेच कोपरगाव ,मनमाड,औरंगाबाद, मुंबई, नाशिक ह्या प्रमुख शहराना जोडणारा मुख्य रस्ता पोहेगाव येथून जातो.तसेच कोपरगाव -पुणे-नाशिक येथे जाणाऱ्या बसेस पोहेगाव येथून प्रवास करतात. बाजारपेठ: पोहेगावात मोठी बाजारपेठ असल्याने आसपासचे १५ते२० गावाशी संबंध येत असतो.पओहे