पोर्तुगालचा सहावा अफोन्सो
King of Portugal and the Algarves | |
माध्यमे अपभारण करा | |
विकिपीडिया | |
स्थानिक भाषेतील नाव | Afonso VI de Portugal |
---|---|
जन्म तारीख | ऑगस्ट २१, इ.स. १६४३ Ribeira Palace (लिस्बन, पोर्तुगाल) |
मृत्यू तारीख | सप्टेंबर १२, इ.स. १६८३ Sintra National Palace (Sintra, पोर्तुगाल) |
चिरविश्रांतीस्थान |
|
टोपणनाव |
|
नागरिकत्व | |
निवासस्थान |
|
व्यवसाय |
|
पद |
|
मातृभाषा | |
उत्कृष्ट पदवी |
|
कुटुंब |
|
वडील | |
आई | |
भावंडे |
|
वैवाहिक जोडीदार |
|
अफोन्सो सहावा (पोर्तुगीज उच्चार: [ɐˈfõsu]; २१ ऑगस्ट, १६४३ – १२ सप्टेंबर, १६८३) हा १६५६पासून मृत्यूपर्यंत पोर्तुगालचा राजा होता. हा ब्रगांझा वंशाचा दुसरा राजा होता. तेराव्या वर्षी सिंहासनावर बसलेल्या अफोन्सोने थेट राज्य कमी काळ केले. सुरुवातीस त्याची आई, लुइसा दे गुझमान हिने १६६२ पर्यंत राज्यकारभार पाहिला. तिला ख्रिश्चन मठात घालवून दिल्यानंतर त्याने लुइस दे व्हॅस्कोन्सेलोल इ सूसा याच्या मदतीने राज्य चालविले
अफोन्सोच्या कारकिर्दीत स्पेनने पोर्तुगालचे स्वातंत्र्य मान्य केले. यामुळे त्याला विजयी असे संबोधले जायचे. अफोन्सो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दुर्बल होता. [१] १६६८ मध्ये त्याचा भाऊ दुसरा पेद्रो याने अफोन्सोला राज्य करण्यास अक्षम ठरवून पदच्युत करण्याचा कट रचला आणि कारभार आपल्या हाती घेतला. यानंतर नाममात्र का होईना अफोन्सोच्या नावाने द्वाही फिरत असे. अफोन्सोची पत्नी राणी मरिया फ्रान्सिस्का हिने अफोन्सोशी झालेले लग्न रद्द करून घेतले व नंतर पेद्रोशी लग्न केले. अफोंसोने आपले उत्तर आयुष्य आण राज्यकाल बंदिवासात असल्यासारखा घालवला.. [२]
वसाहतींमधील घडामोडी
अफोन्सोच्या सत्ताकाळात १६५८मध्ये डचांनी आताच्या श्रीलंकेतील जाफना जिंकून घेतले आणि त्या देशातून पोर्तुगीजांची पूर्णपणे हकालपट्टी केली. त्यानंतर अफोन्सोची बहीण कॅथेरीनच्या लग्नात पोर्तुगालने आफ्रिकेतील टँजियर आणि भारतातील मुंबईची बेटे हुंडा म्हणून दुसऱ्या चार्ल्सच्या हवाली केली. त्याच सुमारास इंग्लिश मध्यस्थीने पोर्तुगालने श्रीलंकेतील जागा सोडल्याबद्दल नेदरलँड्सने ब्राझीलचे पोर्तुगीज शासन मान्य केले.
वंशावळ
8. João I, Duke of Braganza | ||||||||||||||||
4. ब्रगांझाचा दुसरा तेओदोसिया | ||||||||||||||||
9. Catarina of Portugal | ||||||||||||||||
2. पोर्तुगालचा चौथा होआव | ||||||||||||||||
10. Juan, 5th Duke of Frías | ||||||||||||||||
5. Ana de Velasco y Girón | ||||||||||||||||
11. María Téllez-Girón y Guzmán | ||||||||||||||||
1. पोर्तुगालचा सहावा अफोन्सो | ||||||||||||||||
12. Alonso, 7th Duke of Medina Sidonia | ||||||||||||||||
6. Manuel, 8th Duke of Medina Sidonia | ||||||||||||||||
13. Ana de Silva y Mendoza | ||||||||||||||||
3. लुइसा दे गुझमान | ||||||||||||||||
14. Francisco, 1st Duke of Lerma | ||||||||||||||||
7. Juana de Sandoval y la Cerda | ||||||||||||||||
15. Catalina de la Cerda y Portugal | ||||||||||||||||
संदर्भ
- ^ Department Of State. The Office of Electronic Information, Bureau of Public Affairs. "French Alliance, French Assistance, and European diplomacy during the American Revolution, 1778-1782". 2001-2009.state.gov (इंग्रजी भाषेत). 2022-07-19 रोजी पाहिले.
- ^ Helpful up-to-date information (as opposed to note [1] in this feature, an utterly misplaced item from the US Department of State that is chronologically irrelevant, does not even mention Portugal or Afonso VI, and also bears zero relation to the ostensible topic or to the historical period), is available in Martin Malcolm Elbl, Portuguese Studies Review 30 (1) (2022): 131-198. "Through 'Deplorable' Eyes: Barlow in Lisbon (1661) ~ Elite Theatrics, King Afonso VI of Portugal, Bullfights, and a Common English Seaman" (इंग्रजी भाषेत). 2023-04-30 रोजी पाहिले.
साचा:पोर्तुगालचे राज्यकर्ते साचा:ब्रगांझाचे ड्यूक