Jump to content

पोर्ट कॅनेव्हरल

पोर्ट कॅनेव्हरल अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील बंदर आहे. येथे क्रुझनौका आणि मालवाहू नौकांचे धक्के तसेच अमेरिकेच्या आरमाराचा तळ आहे. येथील समुद्री मार्गिकेची खोली १३ मी (४४ फूट) आहे.

जगातील सगळ्यात व्यस्त क्रुझ बंदरांपैकी एक असलेल्या या बंदरातून २०१४ साली ३९ लाख प्रवाशांनी ये-जा केली. येथे डिस्नी क्रुझ लाइन, कार्निव्हल क्रुझ लाइन आणि रॉयल कॅरिबियन क्रुझ लिमिटेड या कंपन्याच्या क्रुझ नौकांचा तळ असतो.

दरवर्षी येथून २.७ लाख टन मालसामानाची वाहतूक होते.