पोपटराव पवार
पोपटराव पवार | |
---|---|
जन्म | पोपटराव बागूजी पवार १९६० |
निवासस्थान | हिवरेबाजार, |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | सरपंच |
धर्म | हिंदू |
पुरस्कार | पद्मश्री[१] |
पोपटराव बागूजी पवार हे महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत.
१९७२ मध्ये महाराष्ट्राला मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं होतं. त्याच दुष्काळात हिवरे बाजार गावाला देखील याचा फटका बसला. शेती आणि पूरक व्यवसायांवर अवलंबून असलेल्या हिरवे बाजारचे हाल होऊ लागले. उत्पन्नाचे साधनच उरले नाहीत. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आणि लोकांमध्ये दारूचे व्यसन जडले. गावात अनास्था माजली. ही अवस्था तब्बल १५ वर्षे होती. १९८९ साली ‘पोपटराव पवार’ हे गावाचे सरपंच झाले. पोपटराव पवार हे गावातील एकमेव पदव्युत्तर शिक्षण झालेले नागरिक होते. त्यांनी गावात लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या कामामुळे गावाचं रूप पालटू लागलं. दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंधारणाचे नियोजन त्यांनी केले.[२]
संदर्भ
- ^ लोकसत्ता ऑनलाइन. "मदर ऑफ सीड' राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार यांना पद्मश्री". 26 जानेवारी 2020 रोजी पाहिले.
- ^ ग्रेट मराठी टीम. "लक्षाधीशांच्या गावाची कहाणी". greatmarathi.com. 2020-01-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-01-26 रोजी पाहिले.