Jump to content

पोप बॉनिफेस तिसरा

पोप बॉनिफेस तिसरा (?? - नोव्हेंबर १२, इ.स. ६०७) हा फेब्रुवारी १९, इ.स. ६०७ ते मृत्युपर्यंत असा नऊ महिने पोप होता. या काळात त्याने पोपच्या निवडींबद्दलचे दोन हुकुमनामे काढले. एका हुकुमनाम्याद्वारे त्याने एक पोप जिवंत असताना त्याच्या उत्तराधिकाऱ्याबद्दलची चर्चा केल्यास त्यास वाळीत टाकण्यात येणार होते तर दुसऱ्यानुसार पोपचे दफन झाल्यावर तीन दिवस पुढील पोपची निवड होऊ शकणार नव्हती.