पॉल रायन
पॉल रायन | |
अमेरिकन प्रतिनिधींच्या सभागृहाचा सभापती | |
कार्यकाळ २९ ऑक्टोबर २०१५ – ३ जानेवारी २०१८ | |
राष्ट्राध्यक्ष | बराक ओबामा |
---|---|
मागील | जॉन बेनर |
पुढील | नॅन्सी पेलोसी |
प्रतिनिधींच्या सभागृहाचा सदस्य विस्कॉन्सिन | |
कार्यकाळ ३ जानेवारी १९९९ – ३ जानेवारी २०१८ | |
पुढील | ब्रायन स्टेइल |
जन्म | २९ जानेवारी, १९७० जेन्सव्हिल, विस्कॉन्सिन, अमेरिका |
राष्ट्रीयत्व | अमेरिका |
राजकीय पक्ष | रिपब्लिकन पक्ष |
पत्नी | जॅना लिटल |
धर्म | ख्रिश्चन |
पॉल डेव्हिस रायन (इंग्लिश: Paul Davis Ryan, २९ जानेवारी १९७०) हा एक अमेरिकन राजकारणी व प्रतिनिधींच्या सभागृहाचा ६२वा सभापती आहे. २०१० पासून सभापतीपदावर राहिलेल्या जॉन बेनरने ह्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर २९ ऑक्टोबर २०१५ रोजी रायनची नवा सभापती म्हणून निवड केली गेली. पॉल रायन १९९९ सालापासून विस्कॉन्सिन राज्याच्या क्र. १ मतदारसंघामधून प्रतिनिधींच्या सभागृहाचा सदस्य निवडून येत आहे. जानेवारी २०११ ते जानेवारी २०१५ दरम्यान रायन सभागृहाच्या अर्थसंकल्प समितीचा चेरमन होता.
रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य असणाऱ्या रायन ह्याला नोव्हेंबर २०१२ मधील अध्यक्षीय निवडणुकीत मिट रॉम्नीने उपराष्ट्राध्यक्षपदाच्या लढतीसाठी निवडले होते परंतु रॉम्नी-रायन जोडगोळीचा निवडणुकीत पराजय झाला.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत