Jump to content

पेल्विकाक्रोमीस पल्चर - क्रीबॅन्सीस

पेल्विकाक्रोमीस पल्चर
[[चित्र:
Kribensis male
|frameless|]]
प्रजातींची उपलब्धता
Least Concern
Status iucn3.1 LC
शास्त्रीय वर्गीकरण
जीवसृष्टी: Animalia
वंश: Chordata
जात: Actinopterygii
वर्ग: Cichliformes
कुळ: Cichlidae
जातकुळी: Pelvicachromis
जीव: P. pulcher
शास्त्रीय नाव
पेल्विकाक्रोमीस पल्चर
(जॉर्ज बौलेन्जर, १९०१)
इतर नावे
  • पेल्मॅटोक्रोमिस पल्चर

बौलेन्जर, १९०१

  • पेल्मॅटोक्रोमिस ऑरिओसेफ्लस

मेनकिन, १९६०

  • पेल्मॅटोक्रोमिस कॅमर्यूनिसीस

थीस व्हॅन डेन ऑडानाएर्डे, १९६८

नायजेरिया आणि कॅमेरून येथील, Cichlid (सिकलीड) गटातील Pelvicachromis pulcher (पेल्विकाक्रोमीस पल्चर) हा एक गोड्या पाण्यातील मासा आहे. मत्स्यपालन छंदामधे हा मासा लोकप्रिय आहे आणि सामान्यत: क्रिबॅन्सीस या नावाने विक्री केली जाते. या माशाला त्याच्या रंगामुळे आणि पोटजातींमुळे आणखी बरीच नावे आहेत. क्रिब, रेड क्रिब, सुपर-रेड क्रिब आणि रेन्बो क्रिब.

वर्णन

समोर अधिक रंगीबेरंगी मादी आहे तर मागे नर आहे.

निसर्गात नर क्रीबॅन्सीस सुमारे १२.५ सेंटीमीटर (०.४१ फूट) लांबीपर्यंत वाढतात आणि जास्तीत जास्त ९.५ ग्रॅम (०.३४ औंस) वजन असते. मादी नरापेक्षा थोडी लहान पण फुगीर असते. मादीची कमाल लांबी ८.१ सेंमी (०.२७ फूट) असते तर वजन ९.४ ग्रॅम (०.३३ औंस) इतके असते. नर आणि मादी, दोघांच्याही अंगावर शेपटीपासून ते तोंडापर्यंत एक गडद काळ्या रंगाची पट्टी असते तसेच, नराचे हलके गुलाबी तर मादीचे गडद गुलाबी रंगाचे पोट असते. काळी पट्टी आणि पोटाचा रंग हा प्रेमयाचना करताना आणि प्रजनन करतेवेळी फार गडद असतो. याच काळात, पाठीवरील पर (Dorsal fin) आणि शेपटीवर (Caudal fin) काळ्या ठीपक्याला सोनेरी रिंगण असणारे निशाणही गडद होतात. एकाच ठिकाणाहून गोळा केलेल्या काही नारांमध्ये रंगांची बहुरूपता आढळली आहे. अंदाजे सहा महिने वयापर्यंत पिलांमधील नर-मादी असा फरक करता येत नाही, यालाच इंग्रजी भाषेत मोनोमॉर्फिक असे म्हणतात.

वितरण, निवास आणि शिकारी

दक्षिण नायजेरिया आणि कॅमरूनच्या किनारपट्टीच्या भाग हा क्रीबॅन्सीस (पेल्विकाक्रोमीस पल्चर) माशाचा अधिवास आहे. सदर अधिवास उबदार असून ( २४–२६ °से or ७५–७९ °फॅ) अम्लीय ते तटस्थ ( पीएच 5.6–6.2) पाणी असते. (12-22 मिलीग्राम एल -1 सीएसीओ 3 ). शोभिवंत माशांच्या व्यापारामुळे क्रीबॅन्सीस मासा (पी. पल्चर) त्याच्या नैसर्गिक अधिवासाबाहेर, म्हणजेच अमेरिकेच्या हवाईमध्येदेखील आढळले आहेत.

संथ आणि वाहत्या, अशा दोन्ही प्रकारच्या पाण्यात ही प्रजात सापडते, त्यातही जिथे दाट पाणवनस्पती उपलब्ध आहेत तेथे आढळतात. [] याच अधिवासात सापडणारे इतर मासे हे पेल्विकाक्रोमीस (पेल्विकाक्रोमीस टेनीऍटस) प्रजातीतील, इतर सिकलीड (cichlid) प्रजातीतील(क्रोमिडोतीलापिया गन्ठेरी (Chromidotilapia guntheri), हेमीक्रोमीस क्रिस्टाटस (Hemichromis cristatus), एच. फॅसायटस (H. fasciatus),तीलापिया मारी (Tilapia mariae) आणि टी झिली T. zilli) सह ब्रायसिनस लॉंगीपिन्नस (Brycinus longipinnis) आणि अफायोसेमीऑन (Aphyosemion) हे मासे आढळतात. सदर प्रजातीचे अनेक संधिसाधू (rheophilic) शिकारी मासे आहेत त्यातील हेप्सेटस ओडोई (Hepsetus odoe), हायड्रोसिनस फोर्स्काहली (Hydrocynus forskahlii) आणि लातेस निलोटीकस (Lates niloticus नाईल गोड्या पाण्यातील एक मासा) हे काही शिकारी मासे आहेत. [] निसर्गात संशोधन करतेवेळी पी.पल्चर मासे पाणवनस्पतींच्या मुळांजवळ खड्डे किंवा गुहा करताना, तेथे राहून त्यांचे संरक्षण करताना आढळून आले आहेत. याच गुहांचा प्रजानानाकरिता वापर केला जातो. सर्वच पी. पल्चर हे असे प्रांतीय (जागा निवडून त्यावर मालकी दाखविणारे) नसतात, अनेक पी. पल्चर हे प्रजनन न करता मोठ्या कळपात राहणे पसंत करतात. []

आहार

काही मत्स्यालयाच्या साहित्यात असे सूचविले गेले की क्रीबॅन्सीस मासा अळ्या, कठीण कवच असलेले जीव (क्रस्टेशियन्स) आणि किडे खातात, [] परंतु, निसर्गात आढळणाऱ्या क्रीबॅन्सीस (पी. पल्चर) माशाच्या पोटातील अन्नाचे विश्लेषण केले असता, वरील संदर्भ हे चुकीचे आहेत हे लक्षात आले. न्वादिआरो (1985) [] यांनी केलेल्या अभ्यासानुसार, निळ्या-हिरव्या शेवाळासमवेत मुख्य खाद्यपदार्थ करड्या रंगाचे शेवाळ (डायटॉम्स), हिरवे शेवाळ, पाणवनस्पतींचे तुकडे होते. कणा नसलेले जलजीव (इन्व्हर्टेब्रेट्स) जरी सेवन केले असले, तरी ते निसर्गात राहणाऱ्या इतर माश्यांच्या तुलनेत नगण्य आढळले.

लैंगिक अस्पष्टता आणि पुनरुत्पादन

पी. पल्चरचे पिल्लू

वर्गीकरण

पेल्विकाक्रोमीस पल्चरचे मूळ वर्णन १९०१ मध्ये जॉर्ज बौलेन्जर यांनी पेल्मॅटोक्रोमिस पल्चर म्हणून केले होते. त्यानंतर, कित्येक कनिष्ठ समानार्थी शब्द (पेल्मॅटोक्रोमिस ऑरिओसेफ्लस, पेल्मॅटोक्रोमिस कॅमर्यूनिसीस) आणि चुकीची ओळख (पेल्मॅटोक्रोमिस क्रीबॅन्सीस, पेल्मॅटोक्रोमिस सुबोसेलाटस वर. क्रीबॅन्सीस आणि पेल्मॅटोक्रोमिस पल्चर वर. क्रीबॅन्सीस) वापरले जात होते. यापैकी काही प्रतिशब्द शोभिवंत मत्स्यपालन छंदात अजूनही वापरले जात आहेत ज्यामुळे या प्रजातीची ओळख करणे गुंतागुंतीचे ठरत आहे. [] [] या प्रजातीसाठी अनेक सामान्य आणि व्यापारात वापरली जाणारी नावे आहेत, उदाहरणार्थ; क्रीबॅन्सीस, क्रिब, रेन्बो क्रिब आणि चुकीचे नाव पेल्माटोक्रोमिस क्रीबॅन्सीस. </br> १९६८ साली थीस व्हॅन डेन ऑडानाएर्डे यांनी पेल्मॅटोक्रोमिस या वर्गाचे पुनर्संशोधन केले. [] त्यावेळी पी. पल्चर, यातील पी. म्हणजेच पेल्विकाक्रोमीस ही वेगळी प्रजात आहे असे ठरवण्यात आले. []

मत्स्यालयामधे

पी. पल्चर प्रजातीची मादी प्रजननासाठी नराला शरीरावरील सर्व रंग गडद करून दाखवीत आहे. यात आपल्याला गडद गुलाबी रंगाच्या पोटाभोवती गडद काळा रंग दिसतोय.

शोभिवंत मत्स्यपालन छंदात किंवा मत्स्यालय ठेवणाऱ्यांमधे पेल्विकाक्रोमीस पल्चर नामक हा छोटा सिकलीड लोकप्रिय आहे. []

संदर्भ

  1. ^ a b Wolfgang Staeck & Horst Linke (1994). African Cichlid I: Cichlids from West Africa : A Handbook for Their Identification, Care, and Breeding. Germany: Tetra Press. ISBN 978-1-56465-166-2.
  2. ^ a b C. S. Nwadiaro (1985). "The distribution and food habits of the dwarf African cichlid, Pelvicachromis pulcher in the River Sombreiro, Nigeria". Hydrobiologia. 121 (2): 157–164. doi:10.1007/BF00008719.
  3. ^ S. Sjölander (1972). "Feldbeobachtungen an einigen westafrikanischen Cichliden" [Field observations on some West African cichlids]. Aquarien Terrarien. Monatsschrift für Ornithologie und Vivarienkunde (German भाषेत). 19: 42–45.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ मिल्स, डीक & ग्वेन वेवर (१९८९). The Tetra Encyclopedia of Freshwater Tropical Aquarium Fishes. न्यू जर्सी: Tetra Press. p. 208. ISBN 978-3-923880-89-8.
  5. ^ Rainer Froese; Daniel Pauly (eds.). http://filaman.uni-kiel.de/Summary/speciesSummary.php?ID=7778. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ Robert J. Goldstein (1970). Cichlids. New Jersey: T.F.H. Publications. p. 59.
  7. ^ Anton Lamboj (2004). The Cichlid Fishes of Western Africa. Bornheim, Germany: Birgit Schmettkamp Verlag. p. 174. ISBN 978-3-928819-33-6.
  8. ^ Paul V. Loiselle (1995). The Cichlid Aquarium. Germany: Tetra Press. ISBN 978-1-56465-146-4.

बाह्य दुवे