पेराग्वे नदी
पेराग्वे नदी Rio Paraguai, Río Paraguay | |
---|---|
आसुन्सियोनजवळ पेराग्वे नदीचे पात्र | |
पेराग्वे नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | मातो ग्रोस्सो, ब्राझील |
मुख | पाराना नदी |
पाणलोट क्षेत्रामधील देश | पेराग्वे, ब्राझील, आर्जेन्टिना, बोलिव्हिया |
लांबी | २,६९५ किमी (१,६७५ मैल) |
सरासरी प्रवाह | ४,६९६ घन मी/से (१,६५,८०० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ११,२२,१५४ वर्ग किमी |
पेराग्वे (पोर्तुगीज: Rio Paraguai, स्पॅनिश: Río Paraguay, ग्वारानी: Ysyry Paraguái) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ही नदी ब्राझील देशाच्या मातो ग्रोसो राज्यामध्ये उगम पावते व साधारण दक्षिण दिशेला वाहते. बोलिव्हिया व पेराग्वे देशांमधून वाहत जाऊन पेराग्वे नदी पेराग्वे-आर्जेन्टिना आंतरराष्ट्रीय सीमेवर पाराना नदीला मिळते.
पेराग्वेची राजधानी आसुन्सियोन हे पेराग्वे नदीवर वसलेले सर्वात मोठे शहर आहे. पेराग्वे नदी सपाट प्रदेशामधून वाहत असल्यामुळे जलवाहतुकीसाठी तिचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.