Jump to content

पेट्रोनास जुळे मनोरे

पेट्रोनास जुळे मनोरे (किंवा पेट्रोनास ट्विन टॉवर्स) ह्या मलेशियाच्या क्वालालंपूर शहरातील जुळ्या गगनचुंबी इमारती आहेत. ह्या इमारतींचे बांधकाम १९९८ साली पूर्ण झाले व १९९८ ते २००४ ह्या काळात पेट्रोनास मनोरे ह्या जगातील सर्वात उंच इमारती होत्या. दोन्ही इमारतींमध्ये ८८ मजले आहेत व ४१ व्या व ४२ व्या मजल्यांदरम्यान ह्या इमारती एकमेकांना एका दुमजली आकाशपुलाने जोडल्या आहेत.

हे सुद्धा पहा