Jump to content

पे पर क्लिक

वेबसाईटच्या माध्यमातून इंटरनेट जाहिरातीमध्ये पे पर क्लिक (याला प्रत्येक क्लिक मागील किंमत असेही म्हणतात) वापरला जातो. यामध्ये जाहिरातदार प्रकाशकाला किंवा वेबसाईटची मालकी असलेल्या संस्थेला जाहिरातील क्लिक मारल्यानंतर ठरावीक रक्कम अदा करतो. यालाच ‘जाहिरातीवर क्लिक मारून दिसण्यासाठी रक्कम खर्ची घालणे’ असही म्हणतात.[]

सर्च इंजिनचा शोध लागल्यानंतर जाहिरातदार बाजारपेठेमध्ये ठरविलेल्या लक्ष्यानुसार बोली करू लागले. परंतु या पद्धतीपेक्षा प्रत्येक क्लिकमागे ठोक रक्कम आकारण्याची पद्धत सर्वसाधारणपणे वापरली जाते. जाहिरातींमध्ये बॅनर जाहिराती, वेबसाईटवरील किंवा सर्च इंजिनशी संबंधित मजकुरांचा समावेश आहे.

यामध्ये जेव्हा जेव्हा लोक एखाद्या साईटवर सर्फिंग करतात तेव्हा या जाहिरातींमुळे त्यांना हवी असलेली वस्तू खरेदी करण्याची संधी सहजपणे उपलब्ध होत असते.

गूगल सारख्या कंपनीने फसवेगिरी किंवा बनावटगिरी होऊ नये यासाठी आज्ञावली तयार केलेली असली तरी देखील या प्रकारच्या जाहिरातीमध्ये प्रत्येक क्लिकमागे फसवणूक होऊ शकते.[] []

हेतू

इंटरनेट मार्केटिंगमध्ये परिणामकारक आणि प्रभावी जाहिरातींमुळे आर्थिक नफा होण्यासाठी पे पर क्लिक, छाप्यामागील दर आणि मागणीप्रति दर या साधनांचा वापर केला जातो. जाहिरातीचा प्रभावीपणा जोखण्यासाठी छाप्यामागील दर या पद्धतीपेक्षा पे पर क्लिक या पद्धतीचा वापर केला जातो. इंटरनेट सर्फिंग करणाऱ्यांकडून जाहिरातीवर जास्तीत जास्त क्लिक मिळविणे हा यामागील मुख्य हेतू आहे.[] []

बांधणी

जाहिरातीचा खर्च व जाहिरातीमुळे क्लिक मारून झालेली संख्या याचे गुणोत्तर काढल्यास पर क्लिक दर मिळतो. याबाबतचे सूत्र खालीलप्रमाणे आहे :

पे पर क्लिक ($) = जाहिरातींवरील खर्च ($) [] ÷ क्लिक मारलेल्याची संख्या (#)

पे पर क्लिक हा दोन पद्धतीने आकारला जातो. फ्लॅट किंवा बोली दराने. या दोनही पद्धतींमध्ये जाहिरातदाराला उपलब्ध मार्गाने क्लिक मिळविणे गरजेचे आहे. जाहिरात प्रभावी असल्यास वेबसाईटवर सर्फिंग करणाऱ्या व्यक्तीकडून अशा प्रकारची क्लिक मिळते. या क्लिकवर छोट्या किंवा दीर्घ मुदतीचा नफा प्राप्त होतो.

फ्लॅट रेट पीपीसी

जाहिरातदार आणि प्रकाशक या पद्धतीनुसार प्रत्येक क्लिकमागे एक ठरावीक रक्कम ठरवतात. बहुतेक ठिकाणी प्रकाशकाकडे दरपत्रक असते. या दरपत्रकामध्ये वेगवेगळया कार्यक्षेत्रात असलेल्या वेबसाईटनुसार दर नमूद कलेले असतात. हे दर जाहिरातीतील मजकूर, त्याची मांडणी आणि त्याची परिणामकारकता यावर अवलंबून असतात.

बोलीआधारित पीपीसी

प्रकाशकाने आयोजित केलेल्या जाहिरातींच्या स्पर्धेमध्ये जाहिरातदार करार करून भाग घेतात आणि यामध्ये लिलाव होऊन सर्वोत्कृष्ट जाहिरातीला आर्थिकदृष्टया बाजारपेठ काबीज करता येते. ऑनलाईन व्यवहाराचा वापर करून प्रत्येक जाहिरातदाराला नियोजित केलेल्या जाहिरातीच्या संकेतस्थळावर जास्तीत जास्त रक्कम अदा करण्यास सांगितले जाते. यामध्ये ज्या जाहिरातीचा जास्तीत जास्त पसंती मिळते त्या जाहिरातीला लिलावात प्रथम क्रमांक मिळतो.

इतिहास

१९९६ मध्ये प्लॅनेट ओॲसिस या वेब डिरेक्टरीच्या स्वरूपात पहिली पीपीसी म्हणून ओळखली जाते. पॅकर्ड बेल एनईसी कॉम्प्युटर्स याचा विभाग असलेल्या आर्क इंटरफेस यांनी ती विकसित केलेली आहे. त्या वेळी बहुतेक सर्व व्यापारी कंपन्यांनी या पहिल्या वहिल्या प्रयत्नाकडे संशयित नजरेने पाहिले होते.[] परंतु १९९७ पर्यंत ४०० पेक्षा जास्त ब्रॅन्ड्जनी या कंपनीकडे .००५$ ते ०२५$ पर क्लिक आणि प्लेसमेंट फी जमा केलेली होती.

फेब्रुवारी १९९८ मध्ये आयडियालॅब आणि गोटू.कॉमचा संस्थापक बिल ग्रोस यांच्याकडे सर्च इंजिनच्या साहाय्याने पीपीसी वापरण्याचे श्रेय दिले जाते.[]

१९९९ मध्ये गूगलने सर्च इंजिन जाहिरातींना सुरुवात केली. सध्या बोली पद्धतीवर आधारित पीपीसी जाहिरातींमध्ये गूगल ॲडवर्ड्स, याहू! सर्च मार्केटिंग आणि मायक्रोसॉफ्ट ॲडसेंटर हे तीन सर्वांत मोठे नेटवर्क ऑपरेटर्स आहेत. []

कायदेशीर बाबी

ऑस्ट्रेलियन कॉम्पिटिशन आणि कन्झ्युमर कमिशनने २०१२ मध्ये गूगलवर एका जाहिरातीमध्ये लबाडी आणि फसवणूक केल्याचा आरोप केला. अशा प्रकारे कायद्याच्या कक्षेत दाखल झालेले हे पहिलेच प्रकरण ठरले. या कमिशनने गूगलवर कारसेल्स या वेबसाईटवरील लिंक व त्यावरील मजकूर फसवून घेतला असल्याचा आरोप केला व गूगलवर दोषारोप दाखल केला. परंतु गूगलने ऑस्ट्रेलिया उच्च न्यायालयामध्ये अपील करून आपली बाजू मांडली आणि त्यामध्ये गूगलला दोषमुक्त केले गेले.[]

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b फेरीज, पॉल डब्ल्यू, नेल टी.बेन्डले; फिलिप ई. पीफेफर; द्रविड जे. रेबस्टिन (२०१०) मार्केटिंग ॲक्टिव्हिटी आणि मेट्रिक प्रोजेक्ट[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती
  2. ^ a b सुमन घोषमजुमदार (मार्च १८, २००८). "फसवेगिरी टाळण्यासाठी माहितीचा वापर" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "अवैध टिचकी आणि छापे कसे टाळाल? [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (इंग्लिश भाषेत). URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "पे पर क्लिक मूलतत्वे" (इंग्लिश भाषेत). 2014-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-01 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; मार्केटिंग आक्टिविटीस नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  6. ^ "प्लॅनेट ओॲसिस यांचेकडून वेबसाईटवरील जाहिरातींची सुरुवात. डिसेंबर ५, २०१२" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ "आडवटायजिंग ऑक्शन" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2014-01-17 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2014-02-01 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "द सिटीवेबगाईड" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: unrecognized language (link)