पॅसिफिक हॅगफिश (शास्त्रीय नाव: एप्पटेटस स्टौटीई) ही हॅगफिशची एक प्रजाती आहे. हे मेसोपेलाजिक पासून महासागरांच्या तळापर्यंत असलेल्या भागामध्ये राहतात. माशांना जबडा नसतो आणि त्याच्या शरीराची योजना पेलियोझोइक माश्यासारखी असते. ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रचंड प्रमाणात चिखल उधळतात.
वर्णन
पॅसिफिक हॅगफिशचे शरीर लांब (ईल सारखे) आहे, परंतु त्यान्चा ईलशी संबंध नाही. आत्तापर्यन्त 63 सें.मी. (25 इंच) हे सर्वात लाम्बीचे आढळून आले आहेत, मॅच्युरिटीनुसार सर्वसाधारण लांबी 42 सें.मी. (17 इंच) असते.