पॅगोडा हे बौद्ध धर्मीयांचे ध्यानकेंद्र व प्रार्थनास्थल होय. चीन, जपान, म्यानमार, कोरिया, श्रीलंका या बौद्ध धर्मीयांचे वर्चस्व असलेल्या देशांमध्ये विविध आकारांतील पॅगोडा पाहायला मिळतात. पॅगोडे हे बहुमजली असतात. म्यानमारमधील पॅगोडा तर जगप्रसिद्ध आहेत. विशिष्ट आकार आणि रचना असलेले हे पॅगोडे आकाशाला भिडतात. म्यानमारमधीलच एका पॅगोडाची प्रतिकृती ग्लोबल विपश्यना पॅगोडा मुंबईत गोराई येथील समुद्राजवळ उभारण्यात आलेली आहे.