Jump to content

पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार (पुस्तक)

अतिमानस ही श्रीअरविंद प्रणीत एक संकल्पना आहे. अतिमानसाचे पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण व्हावे यासाठी ते प्रयत्नशील राहिले. श्रीअरविंद यांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरीस लिहिलेले शेवटचे ८ गद्य लेख म्हणजे 'द सुप्रामेंटल मॅनिफेस्टेशन अपॉन अर्थ' []हे पुस्तक. या पुस्तकाचा मराठी अनुवाद सेनापती बापट यांनी केला आहे.

पृथ्वीवर अतिमानसाचा आविष्कार
लेखकश्रीअरविंद
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)The supramental manifestation upon earth
अनुवादकसेनापती पां. म. बापट
भाषाइंग्रजी-मराठी
साहित्य प्रकारतत्त्वज्ञानपर साहित्य
प्रकाशन संस्थाश्रीअरविंद आश्रम, पॉंडिचेरी
प्रथमावृत्ती१५ ऑगस्ट १९६५
विषयपृथ्वी चेतना, अतिमानसाचे कार्य
पृष्ठसंख्या१३०

पुस्तकाची मांडणी

या पुस्तकातील लेख हे प्रामुख्याने 'बुलेटिन ऑफ फिजिकल एज्युकेशन'साठी लिहिण्यात आले होते. याचे नंतरचे नाव बुलेटिन ऑफ श्रीअरबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन असे आहे.

यामध्ये पुढील लेख समाविष्ट आहेत.

  • संदेश
  • शरीराची पूर्णता
  • दिव्य शरीर
  • अतिमानस आणि दिव्य जीवन
  • अतिमानस आणि मानवता
  • अतिमानस आणि विकासक्रमातील त्याचे स्थान
  • प्रकाशमय मन
  • अतिमानस आणि प्रकाशमय मन

संदर्भ

  1. ^ Sri Aurobindo (1971). SIU AUROBINDO BIRTH CENTENARY LIBRARY. 16. Pondicherry: Sri Aurobiodo Ashram.