पृथ्वीचा आस
पृथ्वी परिवलन करताना ज्या काल्पनिक रेषेभोवती फिरते, त्या रेषेला आस किंवा अक्ष म्हणतात. पृथ्वीचा आस तिच्या सुर्याभोवतीच्या कक्षेच्या संदर्भात २३.५ अंशांनी कललेला आहे.
ऋतू
आसाच्या कलण्यामुळे पूथ्वीवर ऋतू निर्माण होतात. २२ मार्च ते २२ सप्टेंबर या काळात उत्तर धृव सुर्याच्या दिशेने असल्याने उत्तर गोलार्धात उन्हाळा व दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. याउलट २२ सप्टेंबर ते २२ मार्च या काळात दक्षिण धृव सुर्याच्या दिशेने असल्याने दक्षिण गोलार्धात उन्हाळा व उत्तर गोलार्धात हिवाळा असतो.
आसाचे परिवलन
पृथ्वीचा आस उत्तर दिशेला अवकाशात ज्या तार्याजवळ जातो तो धृव तारा होय. मात्र धृव तारा दर काही हजार वर्षांनी बदलतो. याचे कारण आसही स्वतःभोवती दर २८,००० वर्षांनी एक प्रदक्षिणा घालतो.