Jump to content

पूस नदी

पुस नदी
उगम काटा (वाशिम) काटेपूर्णा डोंगरदऱ्यात

पूस नदी ही पैनगंगा या नदीची उपनदी आहे. ही नदी वाशीम तालुक्यातील काटा येथून उगम पाऊन पुसद तालुक्याच्या दिशेने वाहत जाते.[] पूस नदीवरून पुसद (जि.यवतमाळ) हे गावाचे नाव पडले असावे. पूस नदीवर "पूस धरण" पुसद च्या पश्चिम दिशेला आहे १८ किमी वर चिखली या गावाच्या उत्तरेस ५०० मीटर वर आहे. पूस धरण पुसद चे स्व.माजी मुख्यमंत्री वसंतराव राजूसिंग नाईक (महाराष्ट्र हरित क्रांती जनक) यांनी बांधले. पुसद तालुक्याला येथूनच पाणी पुरवठा केला जातो. पुसद शहरापासून पूर्वेला महागाव तालुक्यात पूस नदीवर "लोअर पूस धरण" आहे. महागाव तालुका पूस नदीमुळे बागायती झाला आहे.या धरणातून आजूबाजूच्या गावाला पाणीपुरवठा केला जातो हे धरण महागाव मार्गे गुंज गावापासून पश्चिम दिशेला ७ किमी तर पुसद मार्गे डोंगर गावापासून ४०० मीटर वर आहे. पुढे पुस नदी माहूर जवळ हिवरा संगम येथे पैनगंगेला जाऊन मिळते.



पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ प्र.रा. सावंत. पैनगंगा. मराठी विश्वकोश. १७ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.