Jump to content

पूर्वांचल द्रुतगतीमार्ग

पूर्वांचल द्रुतगतीमार्ग
Map
पूर्वांचल द्रुतगतीमार्गाचे नकाशावरील स्थान
मार्ग वर्णन
देशभारत ध्वज भारत
लांबी ३४०.८ किलोमीटर (२११.८ मैल)
सुरुवात चांद सराय गाव, लखनौ जिल्हा
शेवट हैदरिया गाव, गाझीपूर जिल्हा
स्थान
शहरेलखनौ, बाराबंकी, सुलतानपूर, आझमगढ, गाझीपूर
राज्येउत्तर प्रदेश

पूर्वांचल द्रुतगतीमार्ग हा उत्तर प्रदेश राज्यामधील एक द्रुतगती मार्ग आहे. सुमारे ३४१ किमी लांबीचा हा सहा पदरी द्रुतगतीमार्ग उत्तर प्रदेशची राजधानी लखनौला पूर्वांचल भागासोबत जोडतो. १० ऑक्टोबर २०१८ रोजी ह्या मार्गाचे बांधकाम सुरू झाले व १६ नोव्हेंबर २०२१ रोजी हा मार्ग वाहतूकीस खुला करण्यात आला.

ह्या द्रुतगतीमार्गाचे वैशिष्ट्य असे की ह्या मार्गावर सुलतानपूर जिल्ह्यातील कुरेभर गावाजवळ ३.२ किमी लांबीची धावपट्टी बांधण्यात आली आहे जिचा वापर विमाने उतरवण्यासाठी केला जाऊ शकतो. ह्या महामार्गाला गोरखपूर शहरासोबत जोडणाऱ्या ९१ किमी लांबीच्या गोरखपूर जोड द्रुतगतीमार्गाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच भविष्यात ह्या महामार्गाद्वारे लखनौ ते पाटणा दरम्यान जलदगती वाहतूक सुलभ होईल. त्याचबरोबर आग्रा–लखनौ द्रुतगतीमार्गयमुना द्रुतगतीमार्ग वापरून पाटणा ते दिल्ली जलद वाहतूकीस चालना मिळेल असा प्रशासनाचा अंदाज आहे.

हे सुद्धा पहा