पूनम पांडे
चित्रपट अभिनेत्री | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थानिक भाषेतील नाव | पूनम पांडेय | ||
---|---|---|---|
जन्म तारीख | मार्च ११, इ.स. १९९१ कानपूर | ||
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
व्यवसाय | |||
| |||
पूनम पांडे (जन्म: ११ मार्च, १९९१ - हयात) एक भारतीय मॉडेल आणि अभिनेत्री आहे.[१][२] तिने २०१३ मध्ये नशा या हिंदी चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.[३]
प्रारंभिक जीवन
पांडेचा जन्म ११ मार्च १९९१ रोजी कानपूर येथे झाला.[४][५][६] तिने २०१० मध्ये मॉडेल म्हणून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली.[७] ती ग्लॅडरॅग्ज मॅनहंट अँड मेगा मॉडेल काँटेस्ट च्या पहिल्या नऊ स्पर्धकांपैकी एक बनली आणि एका फॅशन मासिकाच्या मलपृष्ठावर देखील दिसली.[८][९]
प्रसार माध्यमे आणि सवंग प्रसिद्धी
पांडेने जेव्हा आपले अर्ध-नग्न फोटो प्रसारित करण्यास सुरुवात केली तेव्हा ट्विटरसह तिच्या विविध सोशल मीडिया वरील खात्यांद्वारे ती लोकप्रिय झाली. तिच्या प्रकट फोटोंनी मीडियाचे लक्ष वेधले.[१०]
क्रिकेट विश्वचषक, २०११ जिंकल्यास भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी वस्त्रहीन होण्याची घोषणा पांडे केली. ज्यावर विविध समाज माध्यमांवर उलटसुलट प्रतिक्रिया प्राप्त होऊ लागल्या.[११][१२] भारतीय क्रिकेट संघाने खरोखरच हा विश्वचषक जिंकला; तथापि, सामाजिक टीकेमुळे पांडेने तिचे वचन पूर्ण केले नाही. त्यावर तिचे असे म्हणणे होते की तिला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) परवानगी नाकारली होती.[१३] तथापि, तिने तिच्या मोबाइल ॲपवर एक व्हिडिओ चढवला होता, ज्यामध्ये ती रात्री वानखेडे स्टेडियमवर निर्वस्त्र होताना दिसत आहे.[१४]
कोलकाता नाइट रायडर्सने २०१२ मध्ये इंडियन प्रीमियर लीग जिंकल्यानंतर तिने नग्न स्थितीत चित्रीकरण केले होते.[१५][१६][१७]
पांडेने स्वतःचे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले. प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध झाल्यानंतर लगेचच गूगलने सदरील ॲपवर बंदी घातली. आता हे ॲप फक्त तिच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.[१८]
पांडेने इन्स्टाग्रामवर आपल्या प्रियकरा समवेतची एक अश्लील चित्रफीत देखील प्रसारित केली आणि अल्पावधीत परत हटवली देखील.[१९][२०]
चित्रपट कारकीर्द
२०१३ मध्ये, तिने नशा या चित्रपटामध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. ज्यात तिने अशा शिक्षिकेची भूमिका केली होती जी आपल्याच एका विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवते.[२१] 'रेडिफ'ने यावर प्रतिक्रिया देताना असे म्हणले की तिने या भूमिकेत एक मोहक अदाकारा म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.[२२] मुंबई मिररने यावर असे म्हणले की तिने "केवळ मोहक भूमिका केली नसून एक योग्य, जबाबदार नाट्य शिक्षिके" ची भूमिका केली आहे.[२३]
सदरील चित्रपटाचे पोस्टर, ज्यामध्ये 'पूर्णपणे निर्वस्त्र असून आपले शरीर झाकण्यासाठी कुशलतेने दोन प्लेकार्ड ठेवले आहेत' असे चित्रित केलेले होते. संतप्त आंदोलकांच्या एका गटाने २० जुलै २०१३ रोजी मुंबईत काही पोस्टर्स फाडले आणि त्यांना आग लावली.[२४] शिवसेनेचे सरचिटणीस चित्रपत यांनी सदरील जाहिरातींवर आक्षेप घेत म्हणले की, "आम्हाला हे पोस्टर अत्यंत अश्लील आणि अपमानास्पद वाटत आहे आणि अशा होर्डिंग आम्ही लावू देणार नाहीत."[२५]
वैयक्तिक जीवन
पांडेने १ सप्टेंबर २०२० रोजी आपल्या दीर्घकालीन प्रियकर सॅम बॉम्बेसोबत लग्न केले. कोविड-१९ महामारीमुळे हा विवाहसोहळा खाजगी स्तरावर करण्यात आला होता. मुंबईतील राहत्या घरी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत हे लग्न झाले.[२६] ११ सप्टेंबर रोजी पांडेने आपला पती बॉम्बेविरुद्ध एका तक्रार दाखल केली. ज्यात तिने असा दावा केला होता की त्याने तिचा विनयभंग केला, तसेच धमकी आणि मारहाण देखील केली. बॉम्बेला मंगळवारी २३ सप्टेंबर रोजी गोव्यात अटक करण्यात आली, ही घटना दक्षिण गोव्यातील कानाकोना गावात घडली होती.[२७][२८] तथापि, अनेकांनी तिच्यावर IPC कलम 498A चा गैरवापर केल्याचा आरोप केला.[२९] तथापि बॉम्बेला नंतर जामिनावर सोडण्यात आले आणि पांडेने यावर काही स्पष्टीकरण देखील दिले.[३०][३१] दोघांमधील अशा अचानक झालेल्या आपसी सहमतीमुळे अनेकांनी समाज माध्यमांवर असा दावा केला की ही संपूर्ण घटना केवळ एक प्रसिद्धी साठी केलेले एक सोंग आहे.[३२][२९] ५ नोव्हेंबर २०२० रोजी, शासकीय स्थानी नग्न व्हिडिओ चित्रित केल्याबद्दल पांडेला उत्तर गोव्यात अटक करण्यात आली.[३३][३४] गोवा फॉरवर्ड पार्टीने तक्रार आणि एफआयआर दाखल केल्यानंतर ही अटक झाली. गोवा फॉरवर्ड पार्टीच्या म्हणण्यानुसार पांडेचा हा व्हिडिओ गोव्यातील महिलांची बदनामी करणारा आहे.[३१] २०२२ साली एका मोठ्या रतीचीत्र विवाद घोटाळ्यात सामील असल्याचा पांडेवर आरोप झाला होता, ज्यामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक तारे सामील होते. तथापि या प्रकरणात १८ जानेवारी २०२२ रोजी, तिला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले होते.[३५][३६]
मृत्यूची अफवा
तिच्या व्यवस्थापकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट प्रसिद्ध केली ज्यात असे म्हणले होते की पांडे यांचे वयाच्या[३७] ३२ व्या वर्षी १ फेब्रुवारी २०२४ रोजी गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने निधन झाले.[३८] परंतु अवघ्या चोवीस तासात पांडे ने एका चित्रफितीद्वारे जिवंत असल्याचा खुलासा केला. ज्यात तिने असे स्पष्टीकरण दिले की, "मला तुम्हा सर्वांसोबत एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की, मी इथे जिवंत आहे. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने माझा जीव घेतला नाही, पण दुःखाची गोष्ट म्हणजे याने अशा हजारो महिलांचे प्राण घेतले आहेत ज्यांना या रोगाचा सामना कसा करावा याबद्दल काहीच माहिती नव्हती. इतर कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचाव करणे शक्य आहे. फक्त यासाठी एचपीव्ही लस आणि ओळख चाचणी यागोष्टी आवश्यक आहेत. या आजाराने कोणाचाही मृत्यू होणार नाही याची खात्री करण्याचे साधन आमच्याकडे आहे. चला गंभीर जागरूकतेने एकमेकांना सशक्त करूया आणि प्रत्येक स्त्रीला यासाठी घ्यायच्या पावलांची माहिती दिली जाईल याची खात्री करा."[३९]
अभिनय सूची
चित्रपट सूची
वर्ष | शीर्षक | भूमिका | नोट्स | संदर्भ |
---|---|---|---|---|
२०१३ | द अनकॅनी | रिटा | लघुपट | |
नशा | अनिता जोसेफ | (हिंदी) | [४०][४१][४२] | |
२०१४ | लव इज पॉयझन | पाहुणी कलाकार | (कन्नड), "श्याने इष्टा क्रिकेटेट्टू" गाण्यात विशेष उपस्थिती | [४३] |
अदालत | पाहुणी कलाकार | (भोजपुरी) | ||
२०१५ | मालिनी अँड कं. | मालिनी | (तेलुगु) | [४४][४५][४६] |
२०१७ | आ गया हिरो | मसाला गीत | (हिंदी) | [४७] |
जी एस टी - गलती सिर्फ तुम्हारी | (हिंदी) | [४८] | ||
२०१८ | द जर्नी ऑफ कर्मा | कर्मा डिसूझा | (हिंदी) | [४९][५०] |
मालिका
वर्ष | शीर्षक | भूमिका | नोंदी |
---|---|---|---|
२०११ | फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ४ | स्पर्धक | ११ वे स्थान |
२०१५ | टोटल नादानियां | जलेबी बाई | |
प्यार मोहब्बत श्श | |||
२०२२ | लॉक अप | स्पर्धक | सेमीफायनल (७ वे स्थान) |
संदर्भ
- ^ Choudhary, Vidhi (13 September 2015). "Poonam Pandey wants to break the Internet". Livemint (इंग्रजी भाषेत). 1 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 August 2021 रोजी पाहिले.
- ^ "I created controversies to get noticed in Bollywood, says Poonam Pandey". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 9 November 2016. 1 August 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 1 August 2021 रोजी पाहिले.
- ^ "Bollywood debuts of 2013". The Times of India. 14 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 December 2020 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey: We welcome a porn star, but frown at a daughter of the nation – Indian Express". The Indian Express. 25 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey: We welcome a porn star but frown at a daughter of the nation – Indian Express". The Indian Express. 25 April 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 November 2021 रोजी पाहिले.
- ^ "Birthday Special: 50 pics that define Poonam Pandey". India Today. 8 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "I dont mind trying for IIMs: Poonam Pandey". The Times of India. 23 July 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "Poonam Pandey Gladrags Magazine Cover Page Hot Stills". Rediff.com. 6 January 2015 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 June 2013 रोजी पाहिले.
- ^ "Meet Kingfisher model Poonam Pandey". Sify. 23 June 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 June 2013 रोजी पाहिले.
- ^ "Poonam, Sherlyn, Mallika: Who dares to bare for fame?". टाइम्स ऑफ इंडिया. २० जुलै २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.
- ^ "FIR against Poonam Pandey who vowed to strip if India wins World Cup". April 2, 2011. NDTV. 14 December 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 December 2013 रोजी पाहिले.
- ^ "Silly Point: Poonam Pandey WILL strip on final day!". April 1, 2011. Rediff.com. 18 September 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 December 2013 रोजी पाहिले.
- ^ "BCCI did not allow me to strip for Team India: Poonam Pandey". The Economic Times. 2011-04-12. ISSN 0013-0389. 2024-02-02 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey Stripping In Stadium porn video". Indian HQ Videos (इंग्रजी भाषेत). 2019-09-03. 8 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2022-08-01 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey and Rozlyn Khan strip for IPL finalist teams". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-02-02 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey finally strips, for KKR". NDTV.com. 2024-02-02 रोजी पाहिले.
- ^ Kumar, Manoj (2012-05-28). "Adults Only: Poonam Pandey Finally Goes Nude After KKR Win IPL-5 (PHOTO)". www.ibtimes.co.in (इंग्रजी भाषेत). 2024-02-02 रोजी पाहिले.
- ^ "Google suspends Poonam Pandey's 'bold' app, available only on official site". Business Today. 19 April 2017. 28 January 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 January 2020 रोजी पाहिले.
- ^ Team, DNA Web (18 January 2019). "Watch: Poonam Pandey does it again! Leaks her sex tape on Instagram, deletes it later". DNA India. 6 June 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 January 2020 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey s*x video goes viral, later removed – OrissaPOST". Odisha News, Odisha Latest news, Odisha Daily – OrissaPOST. 20 January 2019. 28 February 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 January 2020 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey: I enjoyed romancing a teenager in Nasha". Rediff. 5 June 2013. 11 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 June 2013 रोजी पाहिले.
- ^ Prasanna D Zor (26 July 2013). "Review: Nasha gives you a nice hangover". Rediff. 12 November 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 September 2013 रोजी पाहिले.
- ^ Karan Anshuman (26 July 2013). "Frim review: Nasha". Mumbai Mirror. 29 September 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 September 2013 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey's bold Nasha posters angers Mumbai, Delhi". The Indian Express. 23 July 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey's film publicity irks political party". The Times of India. 20 July 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey on Wedding With Sam Bombay: 'Had to be Private Due to Covid19'". News18. 15 September 2020. 15 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "Newly-wed actress Poonam Pandey accuses husband of molesting, threatening her". timesnownews.com. 22 September 2020. 23 September 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 September 2020 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey Molested By Husband Sam Bombay Controversy: Actress Says, 'Not In The Right State Of Mind'- EXCLUSIVE". Yahoo. 22 September 2020. 27 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 December 2020 रोजी पाहिले.
- ^ a b "'Nobody Molested Her': Poonam Pandey Relentlessly Trolled after FIR Against Husband Sam Bombay". News 18. 23 September 2020. 8 December 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 December 2020 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey patches up with husband Sam Bombay after getting him arrested for molestation?". The Times of India. 29 September 2020. 4 May 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 December 2020 रोजी पाहिले.
- ^ a b Tyagi, Ankur; Handoo, Ritika (5 November 2020). "Poonam Pandey arrested in Goa for allegedly shooting 'porn' video on beach". Zee News. 24 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 December 2020 रोजी पाहिले.
- ^ Nayak, Pooja (27 September 2020). "Poonam Pandey patches up with husband Sam Bombay; netizens call their 'molestation' row a 'publicity stunt'". Times Now News. 25 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 December 2020 रोजी पाहिले.
- ^ "Breaking: Poonam Pandey arrested for shooting obscene video in Goa". DNA India. 5 November 2020. 5 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 5 November 2020 रोजी पाहिले.
- ^ "Goa Police arrest Poonam Pandey for shooting an obscene video at Chapoli Dam". The Times of India. 5 November 2020. 6 November 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 December 2020 रोजी पाहिले.
- ^ "Actor Poonam Pandey Gets Protection From Arrest In Porn Case". 30 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 January 2022 रोजी पाहिले.
- ^ "Porn video case: SC grants protection from arrest to actress Poonam Pandey". 30 January 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 January 2022 रोजी पाहिले.
- ^ "Model-actor Poonam Pandey dies of cervical cancer, says her manager. She was 32". India Today (इंग्रजी भाषेत). 2 February 2024 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2024-02-02 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey dies of cervical cancer, claims her manager". 2024-02-02 रोजी पाहिले.
- ^ "जिंदा हैं पूनम पांडे, एक्ट्रेस ने खुद वीडियो शेयर कर कर दिया खुलासा, बताया-क्यों फैलाई थी मौत की झूठी खबर". एबीपी लाईव्ह. ३ फेब्रुवारी २०२४ रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey's film publicity irks political party". The Times of India. 20 July 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey's bold Nasha posters angers Mumbai, Delhi". The Indian EXPRESS. 23 July 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey Go Nude For Nasha". 29 August 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "PIX: Poonam Pandey's SIZZLING HOT Kannada debut". Rediff.com. 14 October 2013.}
- ^ "Video: Poonam Pandey talks about Malini & Co". The Times of India. 24 February 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "Achieved whatever I wanted through controversy: Poonam Pandey". Deccan Chronicle. 31 December 2014. 24 February 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "Watch my film and judge me: Poonam Pandey". Deccan Chronicle. 26 December 2014. 24 February 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 24 February 2022 रोजी पाहिले.
- ^ "Poonam Pandey to do a item song with Govinda". 11 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 February 2017 रोजी पाहिले.
- ^ "GST: Galti Sirf Tumhari': Poster of new Poonam Pandey movie". scroll.in. 1 November 2017. 13 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 9 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "Trailer of Poonam Pandey's 'The Journey of Karma' is out". The Times of India. 4 October 2018. 5 October 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 25 March 2019 रोजी पाहिले.
- ^ "The Journey of Karma Trailer: Poonam Pandey's Sleazy Scenes With Shakti Kapoor Will Leave You Shocked – Watch Video | LatestLY". Latestly. 3 October 2018. 7 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2018-10-04 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील पूनम पांडे चे पान (इंग्लिश मजकूर)