Jump to content

पूजावसर

मराठीतील पहिली दैनंदिनी

कर्ते बाइदेवबास. रचना इ.स. १२९८. पूजावसरला नित्यदिनी लीळा म्हणतात; कारण त्यात श्रीचक्रधरस्वामींची समग्र दिनचर्या आली आहे.

स्वामींचा प्रातःकाळचा, मध्यान्हकाळचा आणि सायंकाळचा असे तीन पूजावसर म्हणजे पूजाविधीचे प्रसंग हा ग्रंथ सांगतो. पहाटे जाग आल्यापासून निजेपर्यंत स्वामींची दिनचर्या यात बारीकसारीक तपशिलांसह आली आहे. हे महानुभावांच्या नित्यपठणातले प्रकरण आहे. साधीसुधी भाषा आणि तत्कालीन संस्कृतीच्या चालीरीतींचे त्यात पडलेले प्रतिबिंब यांमुळे प्राचीन महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने पूजावसर एक उपयुक्त साधन आहे. राजधर आराध्य उर्फ महंत सोनपेठकर बाबा यांनी पुजावसर याच विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथून पीएचडी प्राप्त केली आहे.