Jump to content

पूजा रानी

पूजा रानी बोहरा (१७ मार्च, १९९२:निमरीवाली, भिवनी जिल्हा, हरयाणा, भारत - ) ही एक भारतीय मिडलवेट मुष्टियोद्धा आहे. ती २०१९ आणि २०२१ची आशियाई विजेता आहे. तिने २०१४ आशियाई क्रीडा स्पर्धेत ७५ किॅग्रॅ वर्गात कांस्यपदक जिंकले. [] [] तसेच २०१६ दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय पूजा रानीने २०१२ आशियाई स्पर्धेत तर २०१५मध्ये कांस्यपदक जिंकले. तिने ग्लासगो राष्ट्रकुल खेळांत मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पूजा रानी ७ वेळा राष्ट्रीय विजेती होती [] तिने २०२० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. []

प्रारंभिक जीवन आणि तयारी

पूजा रानीचे गाव निमरीवाली हे भारतातील मुष्टियुद्धाचे केन्द्र मानले जाते.[] पूजा रानीला येथील हवासिंग बॉक्सिंग अकादमीमध्ये सामील व्हायचे होते परंतु तिचे वडील त्याला नाही म्हणतील हे तिला माहिती होते. एक वर्ष होय-नाही करत तिने शेवटी येथे प्रवेश घेतला पण वडिलांना हे सांगितले नाही. [] सरावात होणाऱ्या जखमा वडिलांना दिसू नये म्हणून ती अशावेळी मैत्रिणींच्या घरी जाउन रहात असे. []

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "POOJA Rani". incheon2014.kr. 2 October 2014 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 3 October 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Indian boxer Pooja Rani settles for Asiad bronze medal". The Times of India. 3 October 2014 रोजी पाहिले.
  3. ^ "Boxer Pooja Rani fails to qualify for Rio Olympics". India Today (इंग्रजी भाषेत). 2018-11-17 रोजी पाहिले.
  4. ^ "Pooja Rani Won 33th Quota For India- Sportstalk24". Sportstalk24. 2020-03-08 रोजी पाहिले.[permanent dead link]
  5. ^ Sharma, Amaninder Pal (25 May 2014). "Boxer Pooja Rani proves her father wrong". The Times of India (TOI). TNN. 12 September 2018 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2 September 2018 रोजी पाहिले.
  6. ^ a b Sengupta, Rudraneil (2014-07-19). "Commonwealth Games 2014 | Five athletes you should know". www.livemint.com/. 2018-11-17 रोजी पाहिले.